बातम्या
उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप
By nisha patil - 10/31/2023 8:59:39 PM
Share This News:
मराठा आरक्षणाचे आंदोलन आता उग्र होत असून दुसरीकडे राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीचा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला आहे. . मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीने आज प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला आणि याला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. प्राथमिक अहवालाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असून उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यास सुरुवात होईल.
उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र वाटप
|