बातम्या

थेरगाव येथील कु.रिया नितिन पाटील हिचा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी तिज्या कोल्हापुरातील घरी जाऊन सत्कार केला.

Kuriya Nitin Patil from Thergaon at her home in Kolhapur


By nisha patil - 3/7/2023 5:23:46 PM
Share This News:



कुंभोज प्रतिनिधी(विनोद शिंगे) दक्षिण कोरियातील इंचियोन येथे झालेल्या २० वर्षांखालील आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ४ बाय ४०० मीटर रिले स्पर्धेत भारतीय रिले संघाने ३:४०.४९ सेकंदाची वेळ नोंदवत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. या संघात कु.रिया हि सहभागी झाली होती. त्याबद्दल आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी कु.रियाचे तिज्या घरी जाऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी रियाचे वडील श्री.नितीन पाटील,कोल्हापुर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक विनोद पाटील,सुनिल पाटील यांच्यासह पाटील कुटुंबिय उपस्थित होते.


थेरगाव येथील कु.रिया नितिन पाटील हिचा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी तिज्या कोल्हापुरातील घरी जाऊन सत्कार केला.