बातम्या

गोकुळ मध्ये कामगार दिन साजरा

Labor day celebration in Gokul


By nisha patil - 1/5/2024 3:54:04 PM
Share This News:



गोकुळ दूध संघ हा महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायात ख्याती असलेला नामांकीत  दूध संघ असून गोकुळचे शेतीपूरक, दुग्ध व्यवसायातील कार्य तसेच दूध संकलन, दुग्ध प्रक्रिया व वितरण व्यवस्था यांचे यशस्वी नियोजन हे शेतकऱ्यांच्या श्रमाचे आणि कामगारांच्या एकजुटीचे प्रतिक आहे. असे उद्गार शिवाजी विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे व आयटकचे सदस्य कॉ.डॉ.अरुण शिंदे यांनी काढले. महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या निर्मितीमध्ये मुंबई शहराच्‍या जडण-घडणीमध्‍ये कामगार संघटना, कामगार चळवळ, कामगार यांनी अतुलनिय योगदान दिले आहे. ज्‍या कामगारांच्‍या कष्‍टावर, घामावर संपत्‍ती निर्माण झाली व होत आहे. त्‍यांनाच देशातील राज्‍यकर्ते विसरले आहेत. यापुढील लढा हा कामगार,शेतकरी, शेतमंजुर, कष्‍टकरी यांचा न्‍यायवाटा त्‍यांना मिळेल यासाठी एकजुटीने लढवावा लागेल. असे मनोगत कॉ.डॉ.अरुण शिंदे यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कामगार संघटना आणि संघ व्‍यवस्‍थापन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बुधवार दि. १ मे २०२४ इ.रोजी गोकुळ प्रकल्प स्थळी कामगार दिन व महाराष्‍ट्र दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहूणे कॉ. डॉ.अरुण शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्‍हाणाले की, एखादी संस्था प्रगती पथावरती नेण्यासाठी त्या संस्थेच्या कर्मचाऱ्याचे योगदान फार महत्त्वाचे असते. तेथील कुशल कर्मचारी यांच्यामुळे संस्था बळकट होत असते. यावेळी कामगार दिनाच्‍या व महाराष्‍ट् दिनाच्‍या शुभेच्छा दिल्या.

 मा.चेअरमनसो यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे व आयटकचे सदस्य डॉ.अरुण शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, कॉ.डॉ.अरुण शिंदे, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महा.व्यवस्थापक अनिल चौधरी, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्‍ण पाटील, मार्केटिंग महा.व्यवस्थापक जगदीश पाटील, व्यवस्थापक वित्त हिमांशू कापडिया, हणमंत पाटील,  संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ.सदाशिव निकम,अध्यक्ष मल्हार पाटील, कॉ व्ही डी पाटील, कॉ लक्ष्मण पाटील, कॉ दत्ता बच्चे, कॉ संभाजी शेलार संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते. 
 


गोकुळ मध्ये कामगार दिन साजरा