बातम्या
वर्षा अखेर नाताळसाठी कोल्हापुरात लाखो पर्यटकांचे आगमन ; अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
By nisha patil - 12/25/2023 7:10:54 PM
Share This News:
वर्षा अखेर नाताळसाठी कोल्हापुरात लाखो पर्यटकांचे आगमन ; अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
कोल्हापूर : वर्षाचा अखेरचा दिवस तसेच नाताळ साजरा करण्याच्या बहाण्याने सलग सुट्ट्यांची संधी साधत भाविक आणि पर्यटकांची कोल्हापुर गजबजलेले पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून भाविकांनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचा आणि त्यांच्या नियोजनाचा बोजवारा उडालेला आहे.
दरवर्षी उन्हाळा दसरा दिवाळी नाताळ या सणांच्या निमित्ताने पडणाऱ्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी असते यंदाही भाविकांनी पर्यटकांना शनिवार रविवारला जोडूनच नाताळची सोमवारची सुट्टी मिळाल्यामुळे सलग तीन दिवसांचा कालावधी सहलीसाठी मिळालेला आहे. त्यातच वर्षा अखेरीलाही शनिवारी आणि रविवारची सुट्टी असल्यामुळे हा संपूर्ण आठवडा कुटुंबियासमवेत तसेच मित्रमैत्रिणी सोबत सुट्टी घालण्याची संधी मिळालेली आहे शुक्रवारी सायंकाळपासूनच राज्यभरातील पर्यटक सहकुटुंब दाखल झालेली पाहायला मिळत आहेत.
तीन लाख भाविकांनी घेतले दर्शन
गेल्या तीन दिवसात तब्बल तीन लाख 14 हजार 443 भाविकांनी कोल्हापुरात करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले रविवारची भाविकांची संख्या सर्वाधिक होती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने गेल्या तीन दिवसातील भाविकांची आकडेवारी रविवारी दिली आहे.
वर्षा अखेर नाताळसाठी कोल्हापुरात लाखो पर्यटकांचे आगमन ; अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
|