बातम्या
लाल बावटा संघटनेची गुरुवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने...
By nisha patil - 7/18/2023 7:05:39 PM
Share This News:
सिद्धनेर्ली : कोल्हापूर व इचलकरंजी कार्यालयातील बांधकाम कामगारांच्या नोंदणी, नुतनीकरण, व लाभाचे अर्ज तपासणीचे काम तात्काळ सुरू करा या मागणीसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने गुरूवार दि २० जुलै रोजी निदर्शने करण्याचा निर्णय संघटनेच्या जिल्हा कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ भरमा कांबळे व जिल्हा सेक्रेटरी कॉ शिवाजी मगदूम यांनी दिली.
कोल्हापूर व इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडील सर्वच नोंदणी अधिकाऱ्यांचे युजर आयडी व पासवर्ड बंद करून त्यांना सांगली कार्यालयाचे आयडी दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूरसह इचलकरंजी येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी, नुतनीकरण, लाभाचे सर्वच कामकाज ठप्प झाले आहे,
सांगली येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे बांधकाम कामगारांच्या पेंडीग अर्जांची संख्या हि हजारोंच्या संख्येने असल्याचे कारण पुढे करीत कामगार मंत्र्याच्या सांगलीच्या जवळच्या सर्वच जिल्ह्य़ातील नोंदणी अधिकाऱ्यांना सांगलीच्या अर्जांचा निपटारा करण्यासाठी, साधारण दिड महीना इतर जिल्ह्य़ातील संपूर्ण कामकाज बंद करून सांगलीचे कामकाज पुर्ण करण्यासाठी जबरदस्त केली आहे, त्यामुळे कोल्हापूर इचलकरंजीसह, सातारा जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्यामध्ये फार मोठा उद्रेक आहे.
त्यामुळे दि १९ पर्यंत सर्वच जिल्ह्य़ातील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी, नुतनीकरण, व लाभाचे सर्वच अर्ज तपासणीसाठी सर्व आयडी कोल्हापूर व इचलकरंजी येथील नोंदणी अधिकाऱ्यांना परत देऊन कामकाज सुरू करावे असीही मागणी यावेळी बैठकीत करण्यात आली.
या मिटींगसाठी कॉ प्रकाश कुंभार,कॉ भगवानराव घोरपडे, कॉ संदीप सुतार,कॉ मोहन गिरी, कॉ आनंदा कराडे, कॉ रमेश निर्मळे, कॉ नुरमहमद बेळकुडे, कॉ बापु कांबळे, कॉ कुमार कागले, कॉ शिवाजी कांबळे, कॉ विजय कांबळे, कॉ दगडू कांबळे आदीसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
लाल बावटा संघटनेची गुरुवारी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने...
|