बातम्या

लालू प्रसाद यादव यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Lalu Prasad Yadavs biopic will come to the audience


By nisha patil - 10/27/2023 7:15:04 PM
Share This News:



बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव  यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.  लालू प्रसाद यादव यांच्यावर जीवनावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, असं म्हटलं जात आहे. आता या बायोपिकमध्ये कोणता अभिनेता प्रमुख भूमिका साकारणार आहे? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. 
 

 राष्ट्रीय जनता पक्षाने लालू यादव प्रसाद यादव यांच्या बायोपिकची माहिती दिली आहे. गेल्या 5-6 महिन्यांपासून चित्रपटावर काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितल या चित्रपटाचे राइट्स यादव कुटुंबाने घेतले आहेत. या चित्रपटाची निर्मिती प्रकाश झा यांच्या प्रोडक्शन हाऊसद्वारे केली जाणार आहे. तेजस्वी प्रसाद या चित्रपटात पैसे गुंतवत असल्याचेही म्हटलं जात आहे.  प्रकाश झा यांनी या प्रोजेक्टबाबत अजून कोणतीही माहिती दिली नाही.लालू प्रसाद यादव यांच्या बायोपिकमधील  स्टारकास्टबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सूत्राने सांगितले की, चित्रपटामध्ये हिंदी चित्रपटसृष्टीमधील काही कलाकार काम करणार आहेत. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लालू प्रसाद यादव यांच्या या  बायोपिकचे नाव  लालटेन, असेल असंही म्हटलं जात आहे. कारण ते त्यांच्या राजकीय पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. पण बायोपिकच्या नावाबद्दल अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.


लालू प्रसाद यादव यांचा बायोपिक येणार प्रेक्षकांच्या भेटीला