बातम्या
रॅम्बो सर्कसचा आज कोल्हापुरात शेवटचा खेळ
By nisha patil - 3/25/2024 4:57:12 PM
Share This News:
रॅम्बो सर्कसचा आज कोल्हापुरात शेवटचा खेळ
कोल्हापुरातील तपोवन मैदानावर या रॅम्बो सर्कसला ४ फेब्रुवारीला सुरुवात
सर्कसने कोल्हापुरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात केलं मनोरंजन
कोल्हापूर २५ मार्च, - सर्कस म्हणले की मुलांबरोबरच मोठ्यांना सुद्धा मनोरंजनाचा आणि धाडस साहस थरार पाहण्याचा आनंद मिळतो.. पूर्वीच्या सर्कस मध्ये आणि आताच्या सर्कस मध्ये आमुलार्ग बदल झाला तरी साहस धाडसाबरोबर मनोरंजनाकडेही सर्कस वळत आहे. त्यामध्येही एक वेगळा अनुभव पहायला मिळतो. कोल्हापुरातील तपोवन मैदानावर या रेम्बो सर्कसला ४ फेब्रुवारीला सुरुवात झाली.. म्हणता म्हणता या सर्कस ला दोन महिने होऊन गेले. या सर्कसने कोल्हापुरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केलं.. रेम्बो सर्कसचे दररोज तीन खेळ पाहायला मिळाले.. दुपारी एक दुपारी तीन व सायंकाळी सात अशा वेळेस या सर्कसी मधून खेळ पाहायला मिळाले याला कोल्हापुरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.
चकचकीत पोशाख केलेली मुला मुलींचे थरारक खेळ अनुभवला मिळाला. लहानग्या विदूषकाने आपल्या करामतीने तर साऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हसवून मनोरंजन केलं. वेगवेगळ्या प्रकारे यामध्ये कला तसेच जादुगिरी ही दाखवण्यात आली. तसेच काही मुलांनी तर उंच झुलावर गोलांट्या उड्या मारत आपली कला दाखवली. त्यामुळे कोल्हापूरकरांनी तर सर्कसचा चांगलाच आनंद लुटल्याच पाहायला मिळाला.. सध्या सर्कस मध्ये जंगली प्राण्यांवर बंदी घालण्यात आले आहे.. तरीही सर्कस मधील सर्व मुला मुलींनी कोणत्याही प्रकारची मनोरंजनांमध्ये कमतरता ठेवली नाही ना नागरिकांना जंगली प्राण्यांची कमतरता भासू दिली.. आता याच लाडक्या सर्कशीचे कोल्हापुरात आज म्हणजेच 25 मार्च रोजी सांगता होणार आहे.. आज या सर्कशीचे तीन खेळ होणार आहेत. हे खेळ दुपारी एक, दुपारी तीन आणि रात्री सात वाजता होणार आहेत. त्यामुळे ज्या नागरिकांनी या सर्कशीचा आनंद लुटलेला नाही त्यांनी आजच जाऊन या सर्कशीचा आनंद घ्यावा
रॅम्बो सर्कसचा आज कोल्हापुरात शेवटचा खेळ
|