विशेष बातम्या

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम

Lavani empress Surekha Punekars Ramram to NCP


By nisha patil - 6/22/2023 5:14:37 PM
Share This News:



लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला रामराम करत नव्या पक्षात प्रवेश केला आहे. 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये मोठ्या धुमधडाक्यात प्रवेश केला होता. मात्र काहीच वर्षात त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. विशेष म्हणजे त्यांनी हैदराबाद येथील भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे सर्वत्र याविषयाची चर्चा रंगली आहे.
सुरेखा पुणेकर या दोन दिवसांआधीच हैद्राबादमधील डेरे येथे दाखल झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. सुरेखा यांना विधानसभा निवडणूका लढवायच्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मोहोळ किंवा देगूलूरमधून बीआरएसच्या तिकिटावर सुरेखा पुणेकर लढण्याची शक्यता आहे. याआधी प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.

दरम्यान, बिग बॉस मराठीमधूनही सुरेखा पुणेकर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या होत्या. याद्वारे त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. काही दिवसांपूर्वीच बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वतील विजेती अभिनेत्री मेघा धाडेने भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे, अभिनेत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या प्रिया बेर्डे देखील उपस्थित होत्या. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिने मेघाने ही माहिती दिली होती.


लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा राष्ट्रवादीला रामराम