बातम्या
जालन्यातील लक्ष्मण हाके यांचे प्राणांतिक उपोषण हे सध्या ओबीसी आंदोलनाचे केंद्रस्थान
By nisha patil - 6/19/2024 8:44:25 PM
Share This News:
महाराष्ट्रातील सरकारने आतापर्यंत ओबीसी समाजाच्या आंदोलनाची दखल घ्यायला पाहिजे होते. पण आम्ही मोठे बॅकग्राऊंड असलेले कार्यकर्ते नाहीत. आम्ही कुठलाही राजकीय चेहरा नसलेले कार्यकर्ते आहोत, म्हणून शासनाला आमची दखल घेऊ वाटत नाही. आमची दखल नका घेऊ पण व्हीजेएनटी, ओबीसींची बाजू काय आहे, हे तरी समजून घ्यावे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी कायम फेसलेस राहिला आहे. महाराष्ट्रातील गरजवंत मराठा आर्थिकदृष्ट्या गरीब आहे. त्यांना ओबीसी आरक्षण भेटल्यावर न्याय मिळतो, हे कोणी सांगितले? आरक्षण हा काही गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. मायबाप सरकारने ही गोष्ट समजून घ्यावी. मी घरापासून दूर आलो. तरी जालना, बीड, परभणी भागात गेलेलो आहे. पण महाराष्ट्र शासन खरं बोलायला तयार नाही, ते दूर पळत आहेत, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.लक्ष्मण हाके यांच्या वडीगोद्री येथील उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. कालपासून लक्ष्मण हाके यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. मध्यंतरी पाणी प्यायल्याने हाके यांची प्रकृती थोडी बरी होती. मात्र, आज सकाळपासून त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे.
जालन्यातील लक्ष्मण हाके यांचे प्राणांतिक उपोषण हे सध्या ओबीसी आंदोलनाचे केंद्रस्थान
|