बातम्या

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली नाराजी व्यक्त....

Leader of Opposition Rahul Gandhi expressed displeasure


By nisha patil - 2/7/2024 7:37:58 PM
Share This News:



लोकसभेत राहुल गांधी यांनी हिंदूंबाबत केलेल्या वक्तव्यावरुन प्रचंड गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर राहुल गांधींच्या भाषणातून मोठा भाग वगळण्यात आला. भाषणातून मोठा भाग काढून टाकण्यात आल्यानं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून यासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे. आपल्या भाषणाचा मोठा भाग संसदेच्या कामकाजातून काढून टाकण्यात आल्यानं आपल्याला धक्का बसल्याचं राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. 
 

राहुल गांधी यांनी आपल्या पत्रात लिहिलं आहे की, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान माझ्या भाषणातील काही भाग वगळण्यात आल्यामुळे मी हे पत्र लिहित आहे. सभागृहाच्या कामकाजातून भाषणाचा काही भाग वगळण्याचा अधिकार अध्यक्षांना असला तरीदेखील लोकसभेतील कार्यपद्धती आणि कामकाजाच्या नियमांच्या नियम 380 मध्ये ज्यांचं स्वरूप नमूद केलं आहे, तेच शब्द वगळण्याची तरतूद आहे.'


विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली नाराजी व्यक्त....