बातम्या
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
By nisha patil - 9/18/2023 4:22:10 PM
Share This News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने नमो नावाने अकरा कलमी योजना जाहीर केल्या महाविकास आघाडी सरकार आणि त्यापूर्वीच्या सरकारच्या कार्यकाळापासूनच या सर्व योजना सुरू आहेत यात एकही नवीन योजना नसून केवळ मोदीजींना खुश करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी नमो नावाने घोषणा केल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आमदार अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत केला
यावेळी बोलताना अंबादास दानवे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात नमो ११ कलमी कार्यक्रमाची घोषणा केली. यात नमो महिला सशक्तिकरण अभियान नमो कामगार कल्याण अभियान नमो शितोळे अभियान, नमो गरीब व मागासवर्गीय सन्मान अभियान ,नमो शितोळे अभियान, नमो आत्मनिर्भर व सौरऊर्जा गाव अभियान, नमो ग्रामसचिवालय अभियान, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान ,नमो दिव्यांग शक्ती अभियान ,नमो क्रीडा मैदान व उद्यान अभियान, नमो शहर सौंदर्यीकरण अभियान आणि नमो तीर्थस्थळ गडकिल्ले संरक्षण अभियान इत्यादींचा समावेश आहे. त्याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना आणि महिला समृद्धी कर्ज योजना अंतर्गत महिलांना अर्थसहाय्य देण्यात येते त्यामुळे ही योजना नवी कशी मंडळ असा सवाल यावेळी अंबादास दानवे यांनी केलाय
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
|