बातम्या

गजानन महाराजांकडून शिका जीवन कसे जगावे

Learn how to live life from Gajanan Maharaj


By nisha patil - 12/16/2023 7:30:53 AM
Share This News:



योगीराज श्री गजानन महाराजांनी भक्तांना आपल्या कृतीतून जीवन कसे जगावे हे शिकवले.
 
अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. अन्नाचा कधीही अपमान करु नये, नासाडी करू नये.आपल्या बोलण्यात आणि वागण्यात सदैव मेळ असावा.
अतिथीस कधीच खाण्या पिण्याचा वाजवीपेक्षा जास्त आग्रह करू नये. 
लोकांना फसवणार्‍यांना आपल्या कर्माचे फळ भोगावे लागतात.
प्रपंच करत असताना परमार्थ सुद्धा करावा. 
संकट आल्यावर ईश्वराची भक्तीच तारून नेते. 
पहिली संपत्ती ही निरोगी शरीर आहे.
पैसा हे सर्वस्व नाही, परमेश्वराची कृपा असणे गरजेचे आहे.
कर्त्या पुरुषाला संसार करताना बरीच संकटे येतात, अशात मुळीच न डगमगता सदैव देवाचा धावा करावा. 
कधीही गर्व करू नये. 
जीव आणि ब्रह्म एकच आहे.
कधीही दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या करू नये. 
मुक्या जनावरांस त्रास देऊ नये. 
संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध ह्या कर्मांचे फळ मनुष्यास भोगावे लागते.
धनाचा दिखावा करू नये.
सर्व धर्म एकत्र येऊन शांततेत जगावे कारण देव एकच आहे.
देवाला खरी भक्ती आवडते आडंबर नव्हे. 
मोक्षाचे तीन मार्ग आहेत- कर्म, भक्ती आणि योग.


गजानन महाराजांकडून शिका जीवन कसे जगावे