बातम्या

स्पा थेरपी काय आहे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.

Learn what spa therapy is and its benefits


By nisha patil - 9/24/2023 9:26:00 AM
Share This News:



दैनंदिन जीवनामध्ये शरीर स्वास्थ्यासाठी स्वेदन, स्नेहन, योग अभ्यास, पंचकर्म, चुंबकीय थेरपी, वेगवेगळ्या थेरपी, त्याचबरोबर वेगवेगळे बॉडी आणि ब्युटी स्पा प्रकार आपण आजूबाजूला ऐकत आहोत.

पाहत आहोत अनुभवत आहोत. नक्की बॉडी स्पा किंवा स्पा हा प्रकार काय आहे? काय केलं जातं या “स्पा’मध्ये आपल्या शरीराबरोबर, नक्की कोणी या थेरपी केल्या पाहिजेत, नक्कीच स्पा थेरपी म्हणजे काय आहे? कधी कधी बऱ्याच ठिकाणी आपल्याला याचा संदर्भ माहीत नसतो. आपण फक्त ऐकून असतो काही तरी फॅड सुरू आहे म्हणून. आपणही ते करत असतो, असे अनेक अनुभव आतापर्यंतच्या व्यावसायिक जीवनात आम्हाला आले आहेत. अनेक लोकांना बॉडी स्पा आणि बॉडी मसाज यामधील फरक माहित नाही.

यासंदर्भात थोडी माहिती जाणून घेऊ. बॉडी स्पा म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे शरीर स्वास्थ्यासाठी केला जाणारा एक उपचार हे सगळे मसाज पाश्‍चिमात्य संस्कृतीतून आपल्याकडे प्रचलित होत आले. शरीर मसाजचे शास्त्र भारतीय संस्कृतीचे परिमाण आहे. वेगवेगळ्या देशानुसार किंवा पश्‍चिमात्य संस्कृतीनुसार शरीर मसाजला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. स्पा हे जे काही आपण आता सगळीकडे बघत आहोत, यामध्ये शरीर स्वास्थ्यासाठी वेगवेगळ्या मसाज, शरीरावरील मृत त्वचा काढून टाकण्याचे तसेच शरीरावरील त्वचेला तजेला देण्याचे मऊ मुलायम ठेवण्यासाठीचे असे काही विधी केले जातात, ज्यामध्ये शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया तसेच चयापचय प्रक्रिया याचे काम सांभाळले जाते. ज्यामुळे शरीर सुदृढ उत्तेजित होऊन मानसिक तरतरी मिळते.

साधारणतः खूप बसून काम करणारे, खूप प्रवास करणारे, दिवसभर टेबल वर्क करणारे, कम्प्युटर अथवा लॅपटॉप स्क्रीनसमोर सतत बसून काम करणाऱ्या लोकांना बॉडी मसाज अथवा बॉडी स्पा या गोष्टींची खरंच खूप गरज असते. शारीरिक हालचाली करणाऱ्या लोकांना बॉडी मसाज अथवा बॉडी स्पाची तशी गरज लागत नाही. आपल्या शरीराच्या हालचाली योग्य वेळेनुसार योग्य प्रमाणात जर होत राहिल्या तर शरीरातील चयापचय आणि रक्ताभिसरण क्रिया नियमितपणे पार पडू शकतात.

पण आजकालच्या या आपल्या कामाच्या बदलत्या स्वरूपामुळे मुख्यतः सर्वांची कामे एका जागी बसून होत आहेत. अशा वेळी शारीरिक हालचाली न झाल्यामुळे आपल्याला शरीरामध्ये बऱ्याच प्रकारच्या व्याधींना सामोरे जावे लागते. शरीरातील स्नायूंना तसेच हाडांना योग्य प्रमाणात त्यांच्या हालचाली करून घेणे म्हणजेच योग्य तो बॉडी मसाज करून घेणे होय.

या बॉडी मसाजमध्ये पंचकर्म केरळीयन, आयुर्वेद, वेस्टन मसाज असे अनेक प्रकार आपण ऐकून आहोत. हॉटेलमधील स्पा मध्ये अथवा ब्युटी सलोन आणि स्पामध्ये मुख्यत्वे करून स्वीडिश, डिप टिश्‍यू, रिफ्लेक्‍सलॉजी, स्पोर्टस मसाज, हेड नेक शोल्डर मसाज, अरोमा बॉडी थेरपी, मड थेरपी, वॉटर थेरपी, स्टीम बाथ अशा अनेक प्रकारच्या स्पा थेरपी उपलब्ध असतात.

यापैकी आपण स्वीडिश बॉडी मसाज तसेच डीप टीश्‍यू बॉडी मसाज यापैकी थोडे जाणून घेऊ. डीप टिशू बॉडी मसाजला खोल मसाज थेरपी असेही म्हणतात. स्वीडिश मसाज हा संपूर्ण शरीराचा मसाज आहे जो अतिशय हळूवारपणे केला जातो. प्रथमच मालिश करणे अथवा मसाजचा अनुभव घेणे, यासाठी स्वीडिश मसाज हा उत्तम असतो. संपूर्ण शरीरात वेदना आणि तणाव जाणवत असल्यास स्पर्शास संवेदनशीलपणा जाणवत असल्यास हा मसाज आरामदायी ठरतो. तुमचे स्नायू सोडण्यासाठी आणि तुमचे संपूर्ण शरीर आरामदायी करण्यासाठी स्वीडिश मसाज एक उत्तम पर्याय आहे. या मसाज दरम्यान, थेरपिस्ट शरीरावर या तंत्रांचा वापर करतात. शरीराच्या भागांपासून लांब दिशेने स्ट्रोक करतात, शरीरावर मसाज करत असताना पूर्ण हाताचा तळव्याचा वापर करतात.

खोल गोलाकार हालचाली करून शरीरावर कंपन आणि टॅपिंग पद्धतीच्या हालचाली करतात. ग्राहकाच्या गरजेनुसार स्नायूंवर दबाव देतात. एका लयबद्ध पद्धतीमध्ये हा मसाज केला जातो. स्वीडिश मसाज सहसा 60 ते 90 मिनिटांपर्यंत असतो. आता थोडे डीप टिश्‍यू मसाजबद्दल जाणून घेऊ. डीप टिश्‍यू मसाजमध्ये स्वीडिश मसाजपेक्षा जास्त दाबाने मसाज करणे समाविष्ट असते. तुम्हाला स्नायूंमध्ये काही जुनाट समस्या असतील, जसे की जखम, कडकपणा इत्यादी, तर तुम्ही खोल टिश्‍यू मसाज करू शकता. हा मसाज स्नायूंचा घट्टपणा आणि स्नायूंच्या तीव्र वेदना कमी करून चिंता कमी करण्यात मदत करतो. डीप टिश्‍यू मसाज दरम्यान थेरपिस्ट आपल्या बोटांनी खूप दाब देऊन आपल्या स्नायूंना खोलवर दाबतो. शरीरावरील सांधे तसेच हाडे यांना आरामदायीपणा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करतो. अशा प्रकारे हा दाब स्नायूंच्या सर्वात खालच्या थरापर्यंत पोहोचतो आणि वेदना कमी होते. हा मसाजही 60 ते 90 मिनिटांचा असतो.

प्रामुख्याने स्वीडिश आणि डीप टीश्‍यू या मसाजमध्ये अरोमा ऑइलचा वापर करण्यात येतो. या दोन्ही प्रकारच्या मसाजमुळे होणारे फायदे- तणावापासून मुक्ती, नियमित शरीर मालिश केल्याने कोर्टिसोलची पातळी कमी होते. खरं तर हा एक प्रकारचा हार्मोन आहे. ज्यामुळे आपल्याला तणाव जाणवतो. बॉडी मसाज केल्याने तणावासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. मसाजमुळे शरीराचं दुखणं थांबत आणि मन रिलॅक्‍स होतं. दुखण्यात आराम मिळतो. मसाजमुळे शरीरात रक्ताभिसरण वाढते. हे जळजळ कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ज्यामुळे तुम्हाला स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. नसा मोकळ्या होतात. मसाज केल्याने शरीरातील अवघडलेल्या धमण्या मोकळ्या होतात. त्यामुळे ब्लॉक झालेल्या धमण्यांनाही चांगला फायदा होतो. नियमित मसाज केल्याने नसांना आराम मिळतो. यामुळे मनही शांत राहते. ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहते. शांत झोप लागते. मसाज केल्याने शांत झोप लागते.

ज्यांना निद्रानाशाची समस्या आहे. त्यांना फायदा होतो. समस्या दूर करा जर तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होत असेल. रोज रात्री झोपण्यापूर्वी बॉडी मसाज करा. यामुळे थकवा दूर होईल आणि त्याच वेळी तुम्हाला गाढ झोप लागेल. मसाज केल्याने शरीर आणि मनाला आराम मिळतो. अशा एकूण वेगवेगळ्या 15 स्पा थेरपींची माहिती इथून पुढील सदरात करून घेणार आहोत. वेगवेगळ्या मसाजची वेगवेगळी कारणे असतात. वेगवेगळ्या थेरपीसचे वेगवेगळे फायदे असतात. आताच्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला हे मसाजचे तंत्र शरीरस्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी मदतनीस ठरत आहेत. चला, तर जागरूक होऊया थोडेसे स्पा थेरपीबद्दल शिक्षित होऊया.


स्पा थेरपी काय आहे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.