बातम्या

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने व्याख्यान संपन्न

Lecture conducted on behalf of Rotary Club of Kolhapur Midtown


By nisha patil - 9/21/2024 8:14:39 PM
Share This News:



कोल्हापूर: वैद्यकीय क्षेत्रात अनेक नव्या तंत्रज्ञानांचा आणि औषधोपचार पद्धतींचा विकास झाला असला, तरी आजारांचे अचूक निदान करण्यासाठी बराच वेळ लागतो. मात्र, ऍक्युपंक्चर उपचार पद्धती आजाराच्या मुळाशी पोहोचते आणि आजही ती विश्‍वासार्ह उपचार पद्धती आहे, असे प्रतिपादन ऍक्युपंक्चर स्पेशालिस्ट सुमिता सातारकर यांनी केले. रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने आयोजित 'ऍक्युपंक्चर - एक प्रभावी उपचार पद्धती' या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या.

रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊन ही संस्था समाजसेवेमध्ये अग्रेसर आहे. क्लबच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. हॉटेल वृषाली येथे आयोजित या व्याख्यानात पुण्यातील स्वास्थ्य-संतुलन मेडिकेअरच्या संचालिका आणि ऍक्युपंक्चर तज्ञ सुमिता सातारकर यांनी ऍक्युपंक्चर उपचार पद्धतीविषयी सविस्तर माहिती दिली.

त्या म्हणाल्या, “ऍक्युपंक्चर ही प्राचीन भारतीय उपचार पद्धती आहे. १९७० च्या दशकात डॉ. कोटणीस यांनी ही पद्धती रुजवली, आणि सात वर्षांपूर्वी राज्य शासनाने याला वैद्यकीय शास्त्र म्हणून मान्यता दिली आहे. ताण-तणाव आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे उद्भवणाऱ्या आजारांवर ऍक्युपंक्चर हे प्रभावी उपचार आहे. या पद्धतीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत आणि ती वेदनारहित असल्याने ही उपचार पद्धती सुरक्षित मानली जाते.”

यावेळी, रोटरी क्लबच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. व्याख्यानाच्या निमित्ताने क्लबच्या ऑगस्टमधील वृत्त पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले. तसेच जागतिक ओझोन दिनानिमित्त घेतलेल्या ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कारही करण्यात आला.

या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती होती, ज्यात बी. एस. शिंपुकडे, करुणाकर नायक, भारती नायक, रमेश खटावकर, उत्कर्षा पाटील, सचिन लाड यांच्यासह इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेजच्या सदस्यांचाही समावेश होता.
 


रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या वतीने व्याख्यान संपन्न