शैक्षणिक
विवेकानंद मध्ये "इंटरनेट ऑफ थिंग्स व उपयोगिता" या विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 3/15/2025 2:59:05 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये "इंटरनेट ऑफ थिंग्स व उपयोगिता" या विषयावर व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि. 13 : विवेकानंद महाविद्यालयामध्ये सिनिअर इलेक्ट्रॉनिक्स, बी. एस्सी. कॉम्प्यूटर सायन्स एंटायर व आय क्यू ए सी विभागामार्फत ‘इंटरनेट ऑफ थिंग्स व त्याची उपयोगिता’ या विषयावर प्रा. डॉ. एस. ए. शिंदे सहयोगी प्राध्यापक, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचे व्याख्यान झाले. भविष्यात इंटरनेट ऑफ थिंग्स मुळे मानवी गरजा वैद्यकीय, कृषी, बांधकाम, औषध निर्मिती आणि औद्योगिक ऑटोमेशन या क्षेत्रामध्ये अमुलाग्र बदल होणार असून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होणार आहेत. असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार होते. इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ. सी.बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. पी. आर. बागडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन प्रा. जी. बी. जिरगे यांनी केले. प्रा. पूनम पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमास रजिस्ट्रार श्री. आर. बी. जोग, प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
विवेकानंद मध्ये "इंटरनेट ऑफ थिंग्स व उपयोगिता" या विषयावर व्याख्यान संपन्न
|