शैक्षणिक

विवेकानंद कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान

Lecture organized on Womens Day at Vivekananda College


By nisha patil - 10/3/2025 10:14:53 PM
Share This News:



विवेकानंद कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान

कोल्हापूर, दि. 10: विवेकानंद कॉलेजच्या प्राणीशास्त्र विभाग, IQAC विभाग व CPR हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अवयवदान, मौखिक आरोग्य, हाडांचा ठिसूळपणा आणि स्तनाच्या कर्करोग या विषयांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमात CPR हॉस्पिटलचे तज्ञ व्याख्याते डॉ. श्रीगणेश कामत यांनी अवयवदानाचे महत्व, प्रक्रिया आणि कायदेशीर व नैतिक पैलूंवर प्रकाश टाकला. त्यानंतर, डॉ. किरण कुलकर्णी यांनी मौखिक आरोग्याच्या महत्वाचे विशद स्पष्टीकरण दिले. स्तनाच्या कर्करोगासंदर्भात डॉ. अनुजा माळी आणि हाडांच्या ठिसूळपणावर डॉ. प्रसाद वाघ यांनी सखोल माहिती पुरवली.

कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के यांच्या नेतृत्वाखाली केले गेले. प्रास्ताविक डॉ. टी. सी. गौपाले आणि आभार प्रदर्शन डॉ. एस. एस. देसाई यांनी केले. बी. एस्सी. भाग I, II, III मधील एकूण 126 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला. प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व IQAC समन्वक डॉ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


विवेकानंद कॉलेजमध्ये महिला दिनानिमित्त आयोजित व्याख्यान
Total Views: 29