बातम्या
गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा घेणाऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी - करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
By nisha patil - 12/19/2023 4:58:35 PM
Share This News:
गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा घेणाऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी - करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड व इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीकल अशा जिवनावश्यक वस्तुंची होलसेल व रिटेल बाजार पेठ आहे. येथे ट्रान्सपोर्ट कंपन्यांची संख्या मोठी आहे. येथून पश्चिम महाराष्ट्र व इतर राज्यात माल पुरविला जातो. येथे ट्रान्सपोर्ट कंपन्यांचे मोठ मोठे गोडावून मोठया प्रमाणात आहेत. या ८ ते १० दिवसापुर्वी चक्क गुटखा विक्रेत्यांची अन्न औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यांने मिटींग घेतली व मार्गदर्शन केले. मग गांधीनगर हे गुटखा, मावा, बनावट दारू याचे मुख्य केंद्र आहे का ? मुख्य केंद्र असेल तर पोलिस प्रशासन करते काय?शासनाने बंदी घातलेल्या व तरूणांचे आरोग्य बिघडणारा माल राजरोस पणे गांधीनगरात मिळतो काय? याचा शोध प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. जो शासनाने बंदी घातलेला गुटखा,मावा व अन्य शरिराला घातक असणाऱ्या पदार्थ विक्रेत्यांची मिटींग घेणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याचा शोध घेवून त्याला करवीर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिलेला हार घालून त्याचा प्रशासनाने सत्कार करावा म्हणून हा हार आम्ही प्रशासनाला देत आहोत.
यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री कशी करावी याची कार्यशाळा घेणाऱ्या या पराक्रमी अधिकाऱ्याला हार घालून त्याचा सत्कार करावा म्हणून शिवसेनेने वरीष्ठ अधिकाऱ्यांना हार देऊन मागणी केली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा तालुकाप्रमुख राजू यादव यांनी दिला. या मागणीचे निवेदन करवीर शिवसेनेच्या वतीने मा. प्र. प्र. फावडे मॅडम, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, कोल्हापूर यांना देण्यात आले. यावेळी मा. डी. एम. शिर्के, सहाय्यक आयुक्त हे ही उपस्थित होते.व जिल्हा पोलीस प्रमुखांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आली.
यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा प्रकारे एखादा जबाबदार अधिकारी शासनाने बंदी घातलेल्या पदार्थाची विक्री कशी करावी याची जर कार्यशाळा घेत असेल तर हे अत्यंत चुकीचे आहे. या अधिकाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर योग्य ती कारवाई करू असे आश्वासन करवीर शिवसेनेच्या शिष्टमंडळाला दिले.
यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, तालुका प्रमुख विनोद खोत,उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, गांधीनगर विभागप्रमुख दिपक पोपटानी, पै. बाबुराव पाटील, अजित चव्हाण, किशोर कामरा आदी उपस्थित होते.
गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा घेणाऱ्या अधिकाऱ्याचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी - करवीर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
|