बातम्या

दसरा सणा विषयी अख्यायिका / प्रचलित कथा

Legend  popular story about Dussehra festival


By nisha patil - 10/23/2023 7:05:14 AM
Share This News:



अख्यायिका
साधारण पणे त्रेतायुगापासुन साजरा केला जाणारा विजयादशमी म्हणजेच दसरा हा सण असून या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारण महत्व आहे.

अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच विजयादशमी. असे म्हणतात की, याच दिवशी भगवान रामाचा पूर्वज रघु या आयोध्याधिशाने विश्वजित यज्ञ केला होता. त्या काळापासून म्हणजे त्रेतायुगापासून हिंदू लोक विजयादशमी महोत्सव साजरा करतात.१) विजयादशमीला रावणाचा जन्म झाला आणी वधही. पण याविषयी अनेक लोकांमध्ये मतभेद आहेत.

२) श्रीरामाने विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला अशी अख्यायिका प्रचलित आहे .

३) याच दिवशी पांडव अज्ञातवास संपवून परत आपल्या राज्याकडे निघाले होते.

दसरा सणाच्या काही महत्वाच्या गोष्टी व त्यांचे महत्व
दसरा सणाला शास्त्र आणि शस्त्र पूजनाचे महत्त्व
विजयादशमीला शस्त्र आणि शास्त्र पूजन करण्या बाबत वेगळे वेगळे महत्त्व आहे प्राचीन काळापासून क्षत्रीय युद्धाला जाण्यासाठी या दसरा या दिवसाची निवड करत होते. त्यांचे मानणे असे होते की दसर्‍याच्या दिवशी केलेल्या युद्धा मध्ये विजय निश्चित मिळतो.

क्षत्रीय लोकांप्रमाणे ब्राह्मण लोक देखील दसरा या दिवशी विद्या ग्रहण करण्यासाठी घराबाहेर पडत. तसेच व्यापारी लोक विजयादशमी च्या या पवित्र दिवशी नवीन दुकान, शोरूम इत्यादींचा शुभारंभ करणे शुभ मानतात.दसरा सणाला लागणार्‍या महत्वाच्या काही वस्तु
शमी

दसरा ला शमी वृक्ष पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात प्रत्येक दिवशी संध्याकाळी शमी वृक्षपूजन केल्याने आरोग्य व धन संपत्ती प्राप्त होते असे मानले जाते.

आपट्यांची पाने

या वृक्षाला अश्मंतक असेही म्हणतात. आपट्याची पाने पित्त व कफ दोषांवर गुणकारी आहेत. विजयादशमीला आपट्यांची पाने  परस्परांना दिले जातात. यालाच सोने लुटणे असेही म्हणतात .


दसरा सणा विषयी अख्यायिका / प्रचलित कथा