बातम्या

कोल्हापूरच्या फुटबॉलचे नावलौकिक देश पातळीवर पोहचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू आमदार सतेज पाटील यांची ग्वाही

Let s do our best to bring Kolhapur s football reputation


By nisha patil - 6/2/2024 3:26:36 PM
Share This News:



कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉलचे नावलौकिक देश पातळीवर पोहचवण्यासाठी या खेळाला पाठबळ देण्याबरोबरच ज्या- ज्या ठिकाणी मदत लागेल, तिथे केली जाईल. अशी ग्वाही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. फुटबॉल खेळाडूंना विमा पॉलिसी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

   डॉ डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीन, फुटबॉल खेळाडू, संघाचे प्रशिक्षण आणि पंच यांचा विमा उतरविण्यात आला आहे. या विमा पॉलिसीचे प्रमाणपत्र, वितरण विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष माजी आमदार मालोजीराजे छत्रपती आणि आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी,
फुटबॉल खेळताना काही वेळा खेळाडू जखमी होत असतात. अशावेळी त्यांच्या उपचारासाठी आर्थिक अडचण निर्माण होत असल्याने, डॉ डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीन फुटबॉल खेळाडूंचा विमा ठरवण्याचा निर्णय घेतला होता. या विमा संरक्षणामुळे आतापर्यंत अनेक खेळाडूंना, लाखो रुपयांचे रुग्णालयातील उपचार करण्यात आले आहेत. त्यामुळे ही विमा पॉलिसी म्हणजे खेळाडूसाठी एक आधार ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या फुटबॉलला शिस्त लागण्याची गरज देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. कोल्हापूरची ओळख ही स्पर्धात्मक टिकली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया असे आवाहनही त्यांनी केले. याशिवाय कोल्हापूर आणि फुटबॉल ही एक वेगळी ओळख असून, कोल्हापूरच्या फुटबॉलचे नावलौकिक देश पातळीवर पोहचवण्यासाठी या खेळाला पाठबळ देण्याबरोबरच ज्या- ज्या ठिकाणी मदत लागेल, तिथे केली जाईल. असेही त्यांनी सांगितले.

    माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी, फुटबॉल खेळाडू, . त्याचबरोबर संघाचे प्रशिक्षक आणि पंच यांचे विमा उतरवण्याचा एक स्तुत्य उपक्रम डॉ डी.वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्टच्या वतीने राबवण्यात येत असल्याबद्दल त्यांनी आमदार सतेज पाटील यांचे आभार मानले. दरम्यान फुटबॉल सामन्यावेळी घडलेल्या काही अनुचित घटनांचा संदर्भ घेत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी प्रत्येकाने खेळाडू वृत्ती जोपासण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितले. खेळामध्ये हार - जीत होत असते. मात्र ज्याच्याकडे खेळाडूवृत्ती आहे. त्यांनी ती हार पचवली पाहिजे. वाद - विवाद संघर्ष टाळला पाहिजे. असे आवाहन करण्याबरोबरच कोल्हापूरचा फुटबॉल पुढे नेऊया एक चांगल्या प्रकारे कोल्हापूरचे नाव राहिले पाहिजे. याची जबाबदारी सर्वांनी घेण्याचे आवाहन देखील माजी आमदार मालोजीराजे यांनी केले.

    आमदार जयश्री जाधव यांनी, फुटबॉल आणि कोल्हापुर हे समीकरण जवळचे आहे. या खेळाला पाठबळ देण्याकरिता आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, पाटाकडील तालीम मंडळ अ आणि ब, प्रॅक्टीस क्लब, संयुक्त जुना बुधवार पेठ, फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ, झुंजार क्लब, संध्यामठ तरुण मंडळ, बीजीएम स्पोर्ट्स, सम्राटनगर स्पोर्ट्स, उतरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, सोल्जर ग्रुप या सर्व संघातील  फुटबॉल खेळाडू, संघाचे व्यवस्थापक आणि  पंच असे एकूण 364 जणांना विमा पॉलिसीचे वितरण करण्यात आले. यामध्ये रेफरी असोसिएशनचा देखील समावेश होता. यावेळी, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने, माजी नगरसेवक सचिन पाटील, राहुल माने दुर्वास कदम, संदीप सरनाईक पाटाकडील तालमी मंडळाचे प्रशिक्षक शिवाजी पाटील, शिवाजी तरुण मंडळाचे प्रशिक्षक संतोष पवार, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे, दिलबहार तालमीचे प्रशिक्षक धनजंय सुर्यवंशी यांच्यासह फुटबॉल खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कोल्हापूरच्या फुटबॉलचे नावलौकिक देश पातळीवर पोहचवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू आमदार सतेज पाटील यांची ग्वाही