बातम्या

मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो . डॉ. आर. डी. मांडणीकर. शहाजी महाविद्यालय राष्ट्रीय मतदार दिवस साजरा

Let the voter be the seat of the king and be the thread of democracy


By nisha patil - 1/25/2024 7:43:13 PM
Share This News:



 कोल्हापूर:दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र विभागाच्या वतीने 14 वा राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर आर डी मांडणीकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रथमदर्शनी मतदारांना शपथ दिली
पुढे म्हणाले प्रत्येक भारतीय नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिले परंतु एक कायदेशीर रित्या सामान्य अधिकार जो दिला तो म्हणजे मतदानाचा अधिकार होय या दिवशी सर्व मतदारांमध्ये जागरूकता करणे नवीन मतदारांनी मतदार नोंदणी करणे मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता सदसद विवेक बुद्धीने मतदान करणे मतदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे हे ओळखून प्रत्येक नागरिकांनी मतदान करणे गरजेचे आहे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी व राष्ट्राच्या विकासासाठी मतदान करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर के शानेदिवाण सर हे होते त्यांनी अध्यक्षीय मनोगतात आपणाला मिळालेला मतदानाचा अधिकार हा सहजासहजी मिळालेला आहे संसदीय शासनाची जननी म्हणून ओळखलेल्या इंग्लंड या देशातील लोकांना मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष करावा लागला सर्व मतदारांनी मतदान करावे असे सांगितले मतदाराचे वय 21 वर्षे वरून 18 वर्षे करण्यात आले याचा फायदा असा झाला की 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकीपासून आतापर्यंतच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारी मध्ये वाढ झालेली आहे सरकार बनवण्याचा व सरकार पाडण्याचा आपणाला जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराचा आपण वापर करावा असे सांगितले
राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय मतदार दिनाच्या अनुषंगाने भितीपत्रके तयार केली व त्याचे प्रकाशन करण्यात आले. 

 

राज्यशास्त्र विभागातील प्राध्यापक व नोडल अधिकारी डॉक्टर विजय देठे सर व आंबेसिडर म्हणून अंगराज जाधव व उमेश कुरणे यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे सत्कार करण्यात आले
75 वा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने डॉक्टर विजय देठे सरांनी मार्गदर्शन केले
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील IQAC सह समन्वयक डॉ ए .बी .बलुगडे डॉ के. एम. देसाई ग्रंथपाल डॉक्टर पांडुरंग पाटील डॉ.डि.के वळवी डॉ. एन एस जाधव डॉक्टर एस व्ही शिखरे डॉ.एस.एस.राठोड व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक विद्यार्थी व प्रशासकीय सेवक उपस्थित होते.


मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो . डॉ. आर. डी. मांडणीकर. शहाजी महाविद्यालय राष्ट्रीय मतदार दिवस साजरा