बातम्या

मोदींचे वय होईल तेव्हा विचारू...! अजित पवारांचे पटोले यांना सडेतोड उत्तर

Lets ask when Modi comes of age


By nisha patil - 1/19/2024 12:33:10 PM
Share This News:



मोदींचे वय होईल तेव्हा विचारू...! अजित पवारांचे  पटोले यांना सडेतोड उत्तर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय विचाराचा सल्ला देणाऱ्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना अजित पवार यांनी मोदीं सवय होईल तेव्हा त्यांना विचारू अशा तिखट शब्दात सडेतोड उत्तर दिलं.
   

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपने मांजरी सारखी अवस्था करून ठेवली आहे अजित पवार आणि शरद पवार यांचे वय विचारण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वय विचारले पाहिजे, मग अजित पवारांची हिम्मत असेल अशी बोचक टीका नाना पटोले यांनी अजित पवारांवर केली होती. याला अजित पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे.

मुंबईत आयोजित महिला निर्धार मेळाव्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. आपल्या सगळ्यांचे वय होणार आहे जेवण मोदींचे वय होईल तेव्हा विचारू आमच्या आम्ही बघू बाकीच्यांनी नाक खुपसायचं कारण नाही. नाना तू किती पक्ष भरून आला आहेस आम्हाला माहिती आहे असा पटोले यांना एकेरी उल्लेख करत अजित पवारांनी प्रत्युत्तर दिला आहे


मोदींचे वय होईल तेव्हा विचारू...! अजित पवारांचे पटोले यांना सडेतोड उत्तर