थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी लोकोत्सव म्हणून साजरी करूया....... आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन.......

Lets celebrate the birth centenary of great freedom fighter Daulatrao Nikam as Lokotsav      Assertion of MLA Hasan Saheb Mushrif


By nisha patil - 5/6/2023 6:38:11 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम  
         व्हन्नूर,  थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांनी संपूर्ण आयुष्य निरपेक्ष भावनेने समाजासाठी खर्च केले. त्यांची जन्मशताब्दी सामाजिक व वैचारिक लोकोत्सव म्हणून साजरी करूया, असे प्रतिपादन आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी केले. या जन्मशताब्दीच्या माध्यमातून कै. श्री. निकम यांना अपेक्षित असलेली सामाजिक कामे पूर्ण करूया, असेही ते म्हणाले. 
        व्हन्नूर येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या नियोजनाच्या सर्वपक्षीय बैठकीत ते  अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 
         
आमदार श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले,  स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात दौलतराव निकम यांनी आदर्शवत व त्यागी वृत्तीने कार्य केले. त्यांचा आदर्श समाजासमोर कायम रहावा यासाठी त्यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारूया. हे स्मारक पिढ्यानपिढ्या प्रेरणादायी ठरेल. तसेच, त्यांच्या नावे  स्वागत कमान उभारण्यात पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.  
       

ज्येष्ठ व थोर स्वातंत्र्यसेनानी तसेच कागल तालुक्याचे माजी आमदार कै. दौलतराव निकम यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त त्यांच्या स्मारकाच्या उभारणीसह त्यांच्या नावाचे प्रवेशद्वार. तसेच; स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका, विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांना पुरस्कार,  व्याख्यानमाला, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, स्मरणिका प्रकाशन व मुख्य सांगता समारंभ अशा उपक्रमांचे आयोजन याबाबत निर्णय झाले.
      
बैठकीत गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील, ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने,  शाहूसाखरचे संचालक प्रा. सुनील मगदूम यांनी मनोगते व्यक्त केली.
           
बैठकीस सरपंच पूजा मोरे, धनराज घाटगे, उपसरपंच मंगल कोकणे, अध्यक्षा सुनंदा निकम, अशोकराव नवाळे, यशवंतराव निकम, एम. बी. पाटील (सिद्धनेर्ली), सदाशिव चौगुले (पिंपळगाव खुर्द), भोपाल पाटील व रामगोंड पाटील (कोगील बुद्रुक), संतोष पाटील, संदीप लोंढे, संभाजी संकपाळ, आप्पासाहेब खापणे, रणजीत मोरे यांच्यासह तालुक्यातील सर्वपक्षीय प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.  
        स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक विलास पोवार यांनी केले. सूत्रसंचालन सौ मंगल मोरे यांनी केले. आभार संदीप गुरव यांनी मानले.
व्हन्नूर (ता. कागल) येथे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बोलताना आमदार हसनसाहेब मुश्रीफ.  यावेळी ॲड. वीरेंद्रसिंह मंडलिक, प्रताप उर्फ भैय्या माने, प्रा. सुनील मगदूम, सुनंदा निकम, विलास पोवार


थोर स्वातंत्र्यसेनानी दौलतराव निकम यांची जन्मशताब्दी लोकोत्सव म्हणून साजरी करूया....... आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांचे प्रतिपादन.......