बातम्या
विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून यावर्षीची ही शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करूया. ... राजे समरजितसिंह घाटगे*
By nisha patil - 10/2/2024 8:08:47 PM
Share This News:
येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी होत असलेली छ. शिवाजी महाराज यांची जयंती विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून शिवमय वातावरणात लोकोत्सव म्हणून साजरी करूया,असे आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपचे नेते राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
यावर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला रविवारी सायंकाळी सहा वाजता होणारा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला "वाद्यांचा उत्सव - ताल उत्सव कार्यक्रम विशेष आकर्षण राहणार असून शिवजयंती दिनी (दि.19 ) सालाबादप्रमाणे सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचे आगमन होईल. त्यानंतर बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास हार अर्पण करूनअभिवादन करण्यात येईल,त्यानंतर कार्यक्रमस्थळा वरच उत्सव मूर्तीस वीरेंद्रसिंहराजे घाटगे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.श्रेयादेवी घाटगे या उभयतांच्या हस्ते विधीवत जलाभिषेक घालण्यात येईल. दुपारी बारा वाजता राजमाता जिजाऊ महिला समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पाळणा गायन होईल. यावेळी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे सौ. नंदितादेवी घाटगे यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला समितीच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहील.
बसस्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हे सर्व कार्यक्रम होनार असून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी, तमाम शिवप्रेमी, युवक, महिला भगिनी,नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही श्री घाटगे यांनी केले
यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक शाहू ग्रुपचे पदाधिकारी यांच्यासह भैय्या इंगळे, दीपक मगर, विवेक कुलकर्णी, राजेंद्र जाधव, आप्पासाहेब हूच्चे, उमेश सावंत, सौ विजया निंबाळकर सौ.शितल घाटगे सौ जयश्री कोरवी ,अश्विनी भोसले, शर्मिष्ठा कागलकर, माला चांदेकर, अशितोष अथने, सुशांत कालेकर, अरुण गुरव, गजानन माने, सचिन मोकाशी, अमन आवटे, रणजीत पाटील पन्नू सरकार, संदीप नेरले धीरज गाटगे, पांडू जाधव, संतोष मिसाळ, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला (दिनांक 18 ) रोजी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्र पातळीवर चमकदार कामगिरी करणारा, तसेच झी वाहिनीवरील संगीत सम्राट आणि सारेगमापा या लोकप्रिय कार्यक्रमातून आपल्या समाजाचे आणि संस्कृतीचे नाव उंचावणारा ऋषिकेश देशमाने आणि समूह प्रस्तुत "वाद्यांचा उत्सव - ताल उत्सव" हा कार्यक्रम मुख्य आकर्षण असून या कार्यक्रमातून पारंपरिक वाद्यांसह लोकगीतांतून शिवविचारांचा जागर होईल.शिवाय आताच्या पिढीला पारंपरिक वाद्यांसह लोक गीतांची किमान तोंड ओळख होईल. हा यामागे उद्देश आहे. असे घाटगे म्हणाले.
विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून यावर्षीची ही शिवजयंती लोकोत्सव म्हणून साजरी करूया. ... राजे समरजितसिंह घाटगे*
|