बातम्या
"मी मतदान करणारच" शपथेमध्ये सहभागी होवूया; मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला देशात अग्रेसर बनवूया"
By nisha patil - 4/24/2024 10:19:38 PM
Share This News:
"मी मतदान करणारच" शपथेमध्ये सहभागी होवूया; मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला देशात अग्रेसर बनवूया"
-जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांचे आवाहन
कोल्हापूर, : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 7 मे 2024 रोजी कोल्हापूर जिल्ह्यात मतदान होणार आहे. मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी 1 मे महाराष्ट्र दिनी "मी मतदान करणारच" या अर्थाची शपथ जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराने घ्यावयाची आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी होण्याबरोबरच मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर जिल्ह्याला देशात अग्रेसर बनवूया, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा "स्वीप" चे नोडल अधिकारी कार्तिकेयन एस यांनी केले.
मतदान जनजागृतीबाबत जिल्हा परिषदेच्या समिती सभागृहात कार्तिकेयन एस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रकल्प संचालक सुषमा देसाई, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, अरुण जाधव, शिल्पा पाटील, जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
कार्तिकेयन एस म्हणाले, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व उद्योजक, व्यापारी, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शासकीय व खाजगी आस्थापनांमधील अधिकारी, कर्मचारी, प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक व प्रत्येक मतदाराने प्रयत्न करावा, असे आवाहन श्री कार्तिकेयन यांनी केले.
. कार्तिकेयन म्हणाले, कोल्हापूर जिल्हा अनेक बाबींमध्ये अग्रेसर आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीतही जिल्हा अग्रेसर राहण्यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुन नवा विक्रम नोंद करुया. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये ग्रामीण व शहरी भागातील कमी टक्केवारीने मतदान झालेल्या भागात या निवडणुकीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच व्यापक जनजागृतीवर भर द्यावा. एक मे या महाराष्ट्र दिनी "मी मतदान करणारच" ही शपथ जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारांनी घेऊन विश्वविक्रम बनवूया, असे आवाहन त्यांनी केले. या उपक्रम जिल्ह्यात यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार अंमलबजावणी करा, असे सांगून मागील निवडणूकांच्या तुलनेत या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना बक्षीस देण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
मतदान करण्याची शपथ घेण्यासाठी मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये Google मध्ये Voter's Pledge टाईप केल्यानंतर आपले नाव टाइप केल्यास शपथेचा मजकूर दिसेल. ही शपथ घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे ऑनलाईन प्रमाणपत्र आपल्याला मिळेल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
"मी मतदान करणारच" शपथेमध्ये सहभागी होवूया; मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला देशात अग्रेसर बनवूया"
|