बातम्या
पाऊस ओसरला ; पंचगंगेची पातळी 2 फुटाने कमी
By nisha patil - 10/7/2023 5:11:28 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम : गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार बरसणाऱ्या पावसाने रविवारपासून विश्रांती घेतली आहे जिल्ह्यातील बहुतांशी भागासह धरण क्षेत्रात कालपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत दोन फुटाणे घट झाली आहे. रविवारी सायंकाळी पर्यंत 21 फूट तीन इंचावर असणारी पंचगंगेची पाणी पातळी आज सकाळी 11 वाजेपर्यंत एकोणीस फूट सहा इंचावर आली आहे सध्या पंचगंगा नदीवरील आठ बंधारे पाण्याखाली आहेत.
पाऊस ओसरला ; पंचगंगेची पातळी 2 फुटाने कमी
|