बातम्या

महावितरणमध्ये लाईनमनदिन उत्साहात साजरा

Line Man Day is celebrated with enthusiasm in Mahavitran


By nisha patil - 5/3/2025 10:20:15 PM
Share This News:



लाईनमन हा महावितरणचा कणाच नाही तर आत्मा देखील आहे - मुख्य अभियंता स्वप्नील काटकर

महावितरणमध्ये लाईनमनदिन उत्साहात साजरा

कोल्हापूर, मंगळवार : ऊन, वारा, पाऊस अशा कठिण प्रसंगावर मात करत लाईनमन अहोरात्र परिश्रम घेऊन आपले वीजसेवेचे कर्तव्य बजावित असतात. ग्राहकांपर्यंत प्रत्येक गोष्ट लाईनमन पोहोचवित असतो. लाईनमन हा महावितरणचा कणाच नाही तर आत्मा देखील आहे, असे प्रतिपादन मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी केले.

महावितरण कोल्हापूर परिमंडळ कार्यालयात दि.०४ मार्च रोजी लाईनमन दिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी स्वप्नील काटकर बोलत होते. याप्रसंगी मंचावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे महेंद्र कुलकर्णी, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, पुनम रोकडे, सहाय्यक महाव्यवस्थापक शशिकांत पाटील, विजय गुळदगड यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यकारी अभियंते अभिजीत सिकनीस, प्रशांतकुमार मासाळ, सुधाकर जाधव, सुनिल माने, दत्तात्रय भणगे, दिपक पाटील यावेळी उपस्थित होते. सर्व लाईनमनचा सन्मान करण्यात आला. विद्युत सुरक्षा शपथ घेण्यात आली. कोल्हापूर व सांगली जिल्हयात महावितरणात ठिकठिकाणी लाईनमन दिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.

पुढे बोलताना स्वप्नील काटकर म्हणाले कोल्हापूर परिमंडलाचे नाव महाराष्ट्रात कायम अग्रेसर आहे, त्याचे श्रेय जनमित्रांचे आहे. तसेच यांनी विद्युत वाहिनीवर काम करताना स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे असे सांगताना माझे कुटुंब माझी जबाबदारी, माझी महावितरण माझी जबाबदारी या भावनेणे काम करण्याचा मूलमंत्र दिला. स्वत:च्या सुरक्षितते बरोबरच ग्राहकांना- शेतकऱ्यांना विद्युत वाहीनीबाबत माहिती देऊन त्यांच्यात सुरक्षेबाबत जागृती करण्याचा सल्लाही स्वप्नील काटकर यांनी दिला.

प्रमुख पाहुणे महेंद्र कुलकर्णी यांनी महापूर, कोरोना काळात महावितरणने केलेल्या कामाचे कौतूक केले. आपल्या मनोगतामध्ये लाईनमन हा समाजाचा आधार आहे, लाईनमन मावळ्यामुळे महावितरणचा इतिहास घडत आहे असेही ते म्हणाले. व्यसनापासून दूर राहणे, कुटुंबातील प्रत्येकाशी संवाद साधणे तसेच आयुष्यात संवादाचे महत्वही त्यांनी विशद केले. उपकार्यकारी अभियंता (प्रशिक्षण व सुरक्षा) रत्नाकर मोहिते यांनी सुरक्षा शपथेचे वाचन केले व विद्युत वाहिनीवर काम करताना बाळगण्याच्या सुरक्षीतते संदर्भात माहिती दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक वरिष्ठ व्यवस्थापक (मासं) आप्पासाहेब पाटील, सूत्रसंचालन मुख्य लिपीक उत्तम पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी  शिरीष काटकर यांनी केले.


महावितरणमध्ये लाईनमनदिन उत्साहात साजरा
Total Views: 33