बातम्या

 मुंबई विमानतळावर ब्राझीलच्या प्रवाशाकडून 11 कोटींचे लिक्विड कोकेन जप्त 

Liquid cocaine worth Rs 11 crore seized from Brazilian passenger at Mumbai airport


By nisha patil - 3/21/2025 4:43:46 PM
Share This News:



 मुंबई विमानतळावर ब्राझीलच्या प्रवाशाकडून 11 कोटींचे लिक्विड कोकेन जप्त 

 डीआरआयची कारवाई : कपड्यांमध्ये शिवलेले 1110 ग्रॅम कोकेन पकडले 

साओ पाउलोहून आलेल्या प्रवाशाला अंमलीपदार्थ तस्करीप्रकरणी अटक 

मुंबई विमानतळावर येणाऱ्या एका ब्राझीलच्या नागरिकाकडे अंमलीपदार्थ असल्याची माहिती मिळताच, डीआरआय मुंबईच्या अधिकाऱ्यांनी साओ पाउलोहून AF 218 या फ्लाइटने येणाऱ्या एका प्रवाशाला अडवले. प्रवाशाची वैयक्तिक झडती घेतली असता, त्याच्या आतील कपड्यांमध्ये जाड द्रवाने भरलेले ७ पाऊच शिवलेले आढळले.

फील्ड टेस्ट किटद्वारे चाचणी केली असता, द्रवामध्ये कोकेन असल्याची पुष्टी झाली. या पाऊचमध्ये ती कोकेन घेऊन जात असल्याचेही प्रवाशाने मान्य केले. एकूण 1110 ग्रॅम लिक्विड कोकेन जप्त करण्यात आले, ज्याची अवैध बाजारात किंमत अंदाजे 11.1 कोटी रुपये आहे. जप्त केलेले कोकेन एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत जप्त करण्यात आले असून त्याच कायद्यातील तरतुदींनुसार प्रवाशाला अटकही करण्यात आलीय.


 मुंबई विमानतळावर ब्राझीलच्या प्रवाशाकडून 11 कोटींचे लिक्विड कोकेन जप्त 
Total Views: 32