राजकीय

राज्य उत्पादन शुल्क विभाग शाहूवाडीकडून 3 लाख 24 हजार 560 रुपयांचे वाहनासह मद्य जप्त

Liquor worth Rs 3 lakh 24 thousand 560 seized from State Excise Department Shahuwadi


By Administrator - 11/16/2024 3:25:41 PM
Share This News:



राज्य उत्पादन शुल्क विभाग शाहूवाडीकडून

3 लाख 24 हजार 560 रुपयांचे वाहनासह मद्य जप्त
 
 94 हजार 560 रुपयांचा निव्वळ मद्यसाठा

 
कोल्हापूर, :  विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग शाहूवाडी कार्यालयाकडून वाहनासह 3 लाख 24 हजार 560 रुपयांचा मद्यसाठा वाहनासह जप्त करण्यात आला आहे. यातील निव्वळ मद्याची किंमत 94 हजार 560  रुपये असल्याची माहिती शाहूवाडीचे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाचे निरीक्षकांनी दिली आहे.
     

 कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी या पथकास दिनांक 15 नोव्हेंबर रोजी बातमी मिळाली की, गगनबावडा गावच्या हद्दीत भुईबावडा-गगनबावडा मार्गावर घाटमाथ्यावर वाहन तपासणी करताना 01.00 ते 02.00 च्या सुमारास फोर्ड कंपनीची फिगो टायटॅनियम चारचाकी वाहन तिचा रजि नं. MH04-FR-2410 राखाडी रंग असे वर्णनाची त्यामध्ये आठ खाकी पुठ्याचे बॉक्स त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्य मॅकडावेल्स नं.1 व्हिस्की 180 मिलीचे एकुण 384 मद्याने भरलेल्या काचेच्या सिलबंद बाटल्या व सात खाकी पुठ्याचे बॉक्स त्यामध्ये फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या विदेशी मद्य हनी ब्लॅन्ड बॅन्डी 180 मिलीचे एकुण 336 मद्याने भरलेल्या प्लॅस्टिकच्या सिलबंद बाटल्या. रूपये 94 हजार 560 इतकी  विदेशी मद्याची किंमत तर वाहनाची किंमत रू. 2 लाख 30 हजार असे एकूण मद्य व वाहनासह 3 लाख 24 हजार 560 इतक्या किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

या गुन्ह्यात वाहन चालक अमित यशवंत सावंत, वय 35, रा. गुरव गल्ली, गगनबावडा या इसमास अटक करण्यात आली. या आरोपीविरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (A), (E) & 81,90,108 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
 

या कारवाईमध्ये निरीक्षक के. बी. बिरादार, शाहूवाडीचे दुय्यम निरीक्षक व्ही. आर. शितोळे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस.आर. ठोंबरे व जवान स्टाफ एम.बी.पोवार, के.एम. पाटील, जे.आर. शिनगारे यांनी सहभाग घेतला असून या गुन्हयाचा तपास के. बी. बिरादार निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, शाहूवाडी हे करीत आहेत.


राज्य उत्पादन शुल्क विभाग शाहूवाडीकडून 3 लाख 24 हजार 560 रुपयांचे वाहनासह मद्य जप्त