बातम्या
लोटस मेडिकल फाउंडेशन च्या LGBTQIA+ क्लिनिकचे” उदघटन संपन्न
By nisha patil - 3/22/2024 12:14:52 AM
Share This News:
पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी लोटस मेडिकल फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे आज चार वाजता उद्यम नगर येथील संस्थेच्या आवारामध्ये “LGBTQIA+ क्लिनिकच्या” उदघटनाचा समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
यावेळी बोलताना डॉक्टर किमया शहा यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की या समुदायाच्या ज्या विविध गरजा आहेत, त्यापैकी आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यावरील उपचार या समुदायासाठी अत्यंत आवश्यक असतात. हे सर्व उपचार या केंद्रामध्ये उपलब्ध असतील. सुरुवातीला हे क्लिनिक महिन्यातून एक वेळ असेल. या वैशिष्ट्यपूर्ण क्लिनिकसाठी डॉ. कविता शहा Physchatrist व आम्रपाली जोशी Psychologist यांच्या सेवा उपलब्ध असतील. अशा पद्धतीचे पश्चिम महाराष्ट्रातील हे पहिलेच LGBTOAI+ क्लिनिक आहे.
याप्रसंगी बोलताना मयुरी आवळेकर, “मैत्री” या तृतीयपंथीय संघटनेच्या अध्यक्षा, म्हणाल्या की आमच्या समूहासाठी लोटस मेडिकल फाउंडेशन नेहमीच सहकार्य करते आणि या क्लिनिकमुळे आम्हाला आता हक्काचे डॉक्टर व वैद्यकीय सेवा मिळणार आहे आणि त्यासाठी आम्ही संस्थेचे आभार मानत आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ उषा थोरात, अध्यक्ष लोटस मेडिकल फौंडेशन, यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या व या समुदायातील प्रत्येक घटकाने त्याचा फायदा घ्यावा असे सांगितले. तसेच लोटस मेडिकल फाउंडेशनच्या वतीने आम्ही कोठेही कमी पडणार नाही असे त्यांनी सांगितले.
यावेळी इतरही LGBTQIA + समुदायाच्या लोकांनी आपले मनोगत मांडले. कार्यक्रमास संस्थेचे विश्वस्त सचिन झंवर, रमाकांत भिंगार्डे, सुनील गुंडाळे, डॉक्टर निरंजन शहा, डॉक्टर शिवाजी साठे, डॉक्टर शलाका शहा, सावित्रीबाई फुले हॉस्पिटल, सीपीआर हॉस्पिटल येथील ए आर टी मेडिकल ऑफिसर, डीपीओ दीपा शिपुरकर, डॉक्टर वर्षा मुळीक, डॉक्टर कविता शहा, आम्रपाली जोशी, संग्राम संस्थेचे पदाधिकारी, मैत्री संघटनेचे पदाधिकारी इ. मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोटस मेडिकल फौंडेशन श्री प्रताप कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन सोनाली मोरे यांनी केले.
लोटस मेडिकल फाउंडेशन च्या LGBTQIA+ क्लिनिकचे” उदघटन संपन्न
|