मनोरंजन

"भर" मांडवात उफाळून आले प्रेम

Love blossomed in Mandava Bhar


By nisha patil -
Share This News:



देशभरात लग्नसराई सुरू आहे. जागोजागी ढोल ताशे वाजतायत,वराती निघतायत. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. या सर्वात एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या घटनेत नवरदेव लग्न जमलेल्या नवरीसाठी वरात घेऊन गेला होता,मात्र परतताना तो मेहूणीसोबत लग्न करून आला.त्यामुळे नेमकं नवऱ्यासोबत असं काय घडलं की त्याला अचानक मेहूणीशी लग्न करावं लागलं होतं?  याची चर्चा भर मांडवात सुरू झाली  
भंभौली गावात राहणाऱ्या रामू बीन यांची कन्या रिंकू कुमारीचे लग्न छपराच्या रतनपुरा बिनटोलीत राहणाऱ्या स्वर्गीय जगमोहन महतो यांचा पुत्र राजेश कुमार सोबत 2 मे रोजी जमलं होते. 2 मेला नवरदेव राजेश कुमार बॅंड बाजा बारात घेऊन रिंकू कुमारीच्या घरी आला होता.यावेळी नवरीकडच्यांनी वरातीचे स्वागत केले होते. त्यानंतर लग्नाच्या अनेक विधी पार पडल्या. या सर्व विधीनंतर रिंकू आणि राजेशने एकमेकांना हार घातला होता.लग्नाच्या अर्ध्या विधी उरकल्या असताना नवरदेव राजेश कुमारला अचानक त्याचा मेहूणीचा कॉल आला होता. या कॉलवर मेहूणीने नवरदेवाला धमकी दिली. जर तू माझ्या बहिणीशी लग्न केलेस तर टेरसवरून उडी मारून मी आत्महत्या करेन. या धमकीनंतर लग्नातील वातावरण चांगलेच तापले. यानंतर दोन्ही पक्षात या घटनेवरून मोठी वादावादी झाली होती.
दरम्यान लग्नमंडपातील हसतं खेळतं वातावरण या एका घटनेने पुर्णंत बदललं होतं. वाद वाढताना पाहून गावकऱ्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत वाद शमवला. त्यानंतर नवरदेवाचे लग्न नवरीशी लावण्याऐवजी तिच्या मेहूणीशी लावून देण्यात आले होते.


"भर" मांडवात उफाळून आले प्रेम