मनोरंजन
सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्रींच्या आलिशान घराची किंमती कोट्यवधींच्या घरात
By surekha - 12/7/2023 6:19:11 PM
Share This News:
सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्रींच्या आलिशान घराची किंमती कोट्यवधींच्या घरात
बॉलिवूड अभिनेत्रींच्या आलिशान घराची किंमत कोट्यवधींच्या घरात आहे.अभिनेत्री अनुष्का शर्माच्या घराची किंमत 34 कोटी रुपये आहे.बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौतच्या मुंबईतील आलिशान घराची किंमत 20 कोटी रुपयांच्या आसपास आहे.काजोलच्या मुंबईतील घराची किंमत 12 कोटी रुपये आहे.कियारा आडवाणीच्या घराची किंमत 15 कोटी रुपयांच्या आसपास आहे.बॉलिवूडसह हॉलिवूड गाजवणारी प्रियंका चोप्राच्या घराची किंमतही कोट्यवधींच्या घरात आहे.
'बिग बॉस 13'मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या शहनाज गिलच्या घराची किंमतही कोट्यवधींच्या घरात आहे.आलिया भट्ट नुकतचं मुंबईत 37 कोटी रुपयांचं एक घर खरेदी केलं आहे.मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी चर्चेत असलेल्या जॅकलिनने मुंबईतील वांद्रे येथे एक आलिशान घर खरेदी केलं आहे. या घराची किंमत 12 कोटी रुपये आहे.बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या मुंबईतील घराची किंमत 100 कोटी रुपये आहे.दीपिकाच्या मुंबईतील घराची किंमत 42 कोटी रुपये तर आलिबागमधील घराची किंमत 22 कोटी रुपये आहे.
सुपरस्टार बॉलिवूड अभिनेत्रींच्या आलिशान घराची किंमती कोट्यवधींच्या घरात
|