बातम्या
एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे' च्या महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आज पडला पार
By nisha patil - 8/26/2023 7:47:19 PM
Share This News:
'एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे' च्या महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्याचा कार्यक्रम आज पार पडला हॉटेल आत्रिय,न्यू शाहूपुरी, मेनरोड येते हा कार्यक्रम आयोजित केला असून, या कार्यक्रमामध्ये सर्व महिलांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले
'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे' च्या कार्याचे पुढील निश्चित नियोजन याचे मार्गदर्शन करण्यात आले यामध्ये महिला सक्षमीकरण , जल निवारण, शेती विकास ,ग्रामीण भाग विकास यावर कार्य करण्याचे प्रमुख उदिष्ट आहे असे प्रतिपादन योगेशजी पाटील यांनी केले
महिलांनी एकत्र येऊन विकास काम करायचे आहे आणि MIT राष्ट्रीय सरपंच संसद चे उदिष्ट पूर्ण करून कोल्हापूरचे नाव उज्वल करूयात असे सौ सुप्रिया शिंदे यांनी मत व्यक्त केले. 'एमआयटी - राष्ट्रीय सरपंच संसदे' चे योगेश पाटील,प्रमुख समन्वयक.प्रकाशराव महाले, सहसमन्वयक. .रवींद्रजी पाटील, पुणे विभाग अध्यक्ष. भक्तीताई जाधव, पुणे विभाग महिला समन्वयक.अमर परीट, कोल्हापूर जिल्हा समन्वयक.हर्षवर्धनजी घोरपडे, कोल्हापूर जिल्हा महिला समन्वयक..सुप्रियाताई शिंदे, कोल्हापूर जिल्हा महिला संघटक.बिनाताई देशमुख, कोल्हापूर जिल्हा महिला समन्वयक.वैष्णवी खेडकर, आणि कोल्हापूर जिल्हा महिला सहसमन्वयक..कीर्तिताई देसाई .यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला
एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसदे' च्या महाराष्ट्र राज्य कोल्हापूर जिल्हा महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा कार्यक्रम आज पडला पार
|