बातम्या
आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषकचा मानकरी मोगणे क्रिकेट क्लब
By nisha patil - 2/15/2024 8:28:57 PM
Share This News:
प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : कै. आण्णा मोगणे क्रिकेट क्लब, कोल्हापूर संघाने रायझिंग स्टार, कोल्हापूर संघाचा ७ विकेट व २.५ षटक राखून पराभव करत आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक पटकावला.
शांद फाऊंडेशन व परिवहन कल्चर स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्यावतीने आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषक टी-२० लेदर बॉल खुली आंतरराज्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.
बक्षीस वितरण राष्ट्रीय काँग्रेस औद्योगिक सेलचे प्रदेश सचिव व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, बीसीसीआय वेस्ट झोन व वानखेडे स्टेडियमचे क्युरेटर रमेश म्हामुणकर, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे अध्यक्ष दीपक चोरगे, चेंबर ऑफ कॉमर्स उपाध्यक्ष राजू पाटील, चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, संपत पाटील, राहुल नष्टे, रणजित इंदुलकर, राष्ट्रीय काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष उदय पैठणकर यांच्या हस्ते झाले.
अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रायझिंग स्टारने वीस षटकात ९ बाद १०९ धावा केल्या. यामध्ये वैभव पाटीलने ३२ चेंडूत २५, तेजस तोसणकरने ३६ चेंडूत २२, गौरव कुमकरने ७ चेंडूत १९ धावा केल्या. तर आण्णा मोगणेकडून शुभम माने, राकेश पोलाडने प्रत्येकी तीन तर श्रेयश चव्हाण श्रीराज चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेतल्या. उत्तराधखल आण्णा मोगणे क्रिकेट क्लबने १७.१ षटकात ११३ धावा केल्या. मोगणे क्रिकेट क्लबकडून रणजी खेळाडू संग्राम अतितकरने ४७ चेंडूत नाबाद ४६, महेश मस्के ४१ चेंडूत ४८ धावा करत १०९ धावांचे लक्ष तीन विकेट व २.५ षटक शिल्लक ठेवत विषय मिळवला व आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषकावर नाव कोरले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज महेश मस्के (मोगणे क्रिकेट क्लब), उत्कृष्ट गोलंदाज शुभम माने (मोगणे क्रिकेट क्लब), मालिकावीर शुभम माने (मोगणे क्लब), अंतिम सामन्यातील सामनावीर शुभम माने (मोगणे क्लब).
यावेळी काका पाटील, शांद फाऊंडेशनचे मधू बामणे, अनिल शिंदे, राजू भोसले, शिवाजी पाटील, विक्रम जाधव, विजय कोंडाळकर, योगेश सूर्यवंशी, चारुदत्त सूर्यवंशी, किशोर कटके, अमित ढेरे, राजाराम कुलकर्णी, आशिष पवार, मुकुंद यादव, प्रकाश माजगावकर, दिनकर भोसले, यांच्यासह क्रिकेट प्रेमी नागरिक व खेळाडू उपस्थित होते.
यावेळी विजय स्पोर्ट्स, जवाहर स्पोर्ट्स, सुनील स्पोर्ट्स, गुड मॉर्निंग स्पोर्ट्स, शाहू मिल स्पोर्ट्स, आयडियल स्पोर्ट्स, पद्मा पथक स्पोर्ट्स, सुवर्ण गावस्कर स्पोर्ट्स, दिलीप स्पोर्टस, दिलदार स्पोर्ट्स, पॅपीलॉन स्पोर्ट्स, शास्त्रीनगर स्पोर्ट्स या टेनिस बॉल क्रिकेट संघातील जुन्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. या निमित्ताने जुन्या संघातील सर्व क्रिकेट खेळाडू आज एकत्रित आले होते. त्यांनी याबद्दल जाधव इंडस्ट्रीजचे आभार मानले.
आमदार चंद्रकांत जाधव स्मृती चषकचा मानकरी मोगणे क्रिकेट क्लब
|