बातम्या
महासत्ता चौक, आमराई रोड, इचलकरंजी येथे माऊली मंदिर पायाभरणी व सोलर हायमास्ट दिवे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ
By nisha patil - 9/1/2025 12:37:21 PM
Share This News:
महासत्ता चौक, आमराई रोड, इचलकरंजी येथे माऊली मंदिराच्या पायाभरणीचा व आमदार डॉ. राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या स्वखर्चातून बसविण्यात येत असलेल्या सोलर हायमास्ट दिव्यांच्या शुभारंभाचा सोहळा माजी मंत्री मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास ह.भ.प. सदाशिव उपाशे महाराज, भगतरामजी छाबडा, राहुल घाट, नागेश पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक, समाजबांधव आणि मान्यवर उपस्थित होते. मंदिराच्या उभारणीमुळे परिसरातील भक्तगणांना एक पवित्र धार्मिक व आध्यात्मिक केंद्र लाभणार असून, सोलर हायमास्ट दिव्यांमुळे परिसर प्रकाशमान होणार आहे.
माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे यांनी मंदिर उभारणी व सौर ऊर्जा उपक्रमासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. त्यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले
महासत्ता चौक, आमराई रोड, इचलकरंजी येथे माऊली मंदिर पायाभरणी व सोलर हायमास्ट दिवे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या हस्ते शुभारंभ
|