बातम्या

वीरशैव उत्कर्ष मंडळातर्फे आमदार सतेज पाटील यांचा सत्कार

MLA Satej Patil felicitated by Veerashaiva Utkarsh Mandal


By nisha patil - 9/13/2023 12:04:03 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी आमदार सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना इचलकरंजी शहरातील बसवेश्वर हॉल व बसवेश्वर उद्यानासाठी एक कोटी 17 लाख 83 हजार रुपये निधी मंजुरी केला होता. याबद्दल ते जनसंवाद पदयात्रेदरम्यान इचलकरंजी शहरात आले असता त्यांचा वीरशैव उत्कर्ष मंडळातर्फे माजी नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी  इरगोंडा पाटील, गजानन सुलतानपूरे,  अशोकर स्वामी ,विलास गाताडे,  बाबासाहेब पाटील,  राजन मुठाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार सतेज पाटील यांनी सुरू केलेली जनसंवाद पदयात्रा सोमवारी इचलकरंजी शहरात दाखल झाली. यावेळी त्यांनी प्रथम मॉर्डन हायस्कूल परिसरातील शिव मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी विरशैव उत्कर्ष मंडळ यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आमदार सतेज पाटील हे राज्याचे पालकमंत्री असताना इचलकरंजी नगरपरिषदेच्या वतीने सांगली रोड मार्गावर असलेल्या खुल्या जागेत बसवेश्वर हॉल व बसवेश्वर बगीचा बघण्यासाठी निधीची मागणी केली होती. या कामाचे अंदाजपत्रक एक कोटी 17 लाख 83 हजार रुपये होते.हा निधी मंजूर केला होता. त्यामुळे त्यांचा विरशैव उत्कर्ष मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अमित गाताडे, सुशांत मुरदंडे, अनिल स्वामी, सुरेश पाटील,  बसवेश्वर डोईजड, बाबासाहेब पाटील, किशोर पाटील, युवराज माळी, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.


वीरशैव उत्कर्ष मंडळातर्फे आमदार सतेज पाटील यांचा सत्कार