बातम्या

आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या घेतल्या गाठीभेठी

MLA Satej Patil held a meeting with the chief functionaries and activists of Gaganbawda taluka


By nisha patil - 3/22/2024 9:29:55 PM
Share This News:



गगनबावडा ता.22 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेतल्या. 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ 1999 नंतर काँग्रेसला पक्षाला  मिळाला असून गुरुवारी रात्री उशीरा काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यात कोल्हापूर लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. जवळपास 25 वर्षानंतर कोल्हापूर लोकसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षाचा उमेदवार उभा राहणार असून त्यांच्या विजयासाठी आमदार सतेज पाटील यांनी जिल्ह्यात मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आज गगनबावडा तालुक्यातील नेते व कार्यकर्त्यांच्या गाठीभेठी घेवून कॉग्रेसला विजय करण्यासाठी ताकदीने काम करावे असे प्रतिपादन आ पाटील यांनी केले. 

यावेळी    जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बजरंग पाटील, कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, दत्तात्रय पाटणकर, महादेव पडवळ, पांडुरंग पडवळ, रामचंद्र पाटील, सहदेव कांबळे, उदय देसाई, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर, प्रकाश वरेकर, प्रकाश देसाई, एम. जी. पाटील, संजय पाटील यांच्या भेटी घेत काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांना ‍निवडून आणण्यासाठी सर्वांनी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन ही आमदार सतेज पाटील यांनी केले.


आमदार सतेज पाटील यांनी गगनबावडा तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्याच्या घेतल्या गाठीभेठी