बातम्या
आमदार सुनील कांबळे यांना पोलिसाला मारहाण करणे भोवले
By nisha patil - 6/1/2024 2:57:00 PM
Share This News:
भारतीय जनता पक्षाचे आमदार सुनील कांबळे यांना पोलिसाला मारहाण करणे भोवले आहे. त्यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकामध्ये भादवी कलम 353 (लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा फौजदारी बल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी ससून रुग्णालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला होता.
अजित पवार यांनी शुक्रवारी ससून रुग्णालयातील तृतीयपंथी वॉर्डबरोबरच विविध विकासकामांचे उद्घाटन केले. कार्यक्रमपत्रिकेत आणि कोनशिलेवर स्थानिक आमदार म्हणून आमदार सुनील कांबळे यांचे नाव नसल्याने ते यावेळी संतप्त झाले. या कार्यक्रमा दरम्यान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख जितेंद्र सातव यांचा दोन वेळा आमदार कांबळे यांना धक्का लागला होता. त्यामुळे कांबळे यांनी सातव यांच्या कानशिलात लगावली. तसेच कार्यक्रम संपल्यानंतर मंचावरून खाली उतरत असताना आमदार कांबळे यांनी त्या ठिकाणी सुरक्षा सेवा बजावीत असलेले शिवाजी सरक या पोलीस शिपायाच्याही कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ स्पष्टपणे दिसत आहे. सरक हे साध्या वेशात होते
आमदार सुनील कांबळे यांना पोलिसाला मारहाण करणे भोवले
|