बातम्या
आमदार अपात्रता सुनावणी झाली पूर्ण ; अध्यक्षांकडे निर्णयासाठी फक्त २० दिवच बाकी
By nisha patil - 12/21/2023 7:01:24 PM
Share This News:
आमदार अपात्रता सुनावणी झाली पूर्ण ; अध्यक्षांकडे निर्णयासाठी फक्त २० दिवच बाकी
नागपुर : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरील आमदार अपात्रतेची सुनावणी तीन महिन्यानंतर बुधवारी अखेर पूर्ण झाली. सात साक्षीदारांची उलट तपासणी, युक्तिवाद आणि कागदपत्रांच्या आधारावर नार्वेकर यांना निर्णय द्यायचा आहे. त्यासाठी त्यांच्याकडे वीस दिवसांचा कालावधी असून ते काय निकाल देतात याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
नार्वेकर यांच्यासमोर 14 सप्टेंबर पासून सुनावणीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून सुनावणीतील वेळ काढून पणाबाबत दाखल अशी केवळ सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 31 डिसेंबर पर्यंत सूनावणे पूर्ण करण्याचा अल्टिमेटम दिला होता.
त्यानंतर अधिवेशन काळातच घ्यावी लागलेली सुनावणी आणि अन्य बाबींमुळे सुनावणी पूर्ण करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी महा अधिकवक्ता तुषार मेहता यांच्या माध्यमातून नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली त्यानुसार 10 जानेवारी पर्यंत वेळ वाढवून देण्यात आला तर त्यांना निकाल द्यावा लागणार आहे.
आमदार अपात्रता सुनावणी झाली पूर्ण ; अध्यक्षांकडे निर्णयासाठी फक्त २० दिवच बाकी
|