बातम्या
भोंग्यावरून मनसे पुन्हा आक्रमक
By surekha -
Share This News:
भोंग्यावरून मनसे पुन्हा आक्रमक
बीडमधली एक पुरातन वास्तू सध्या चर्चेचा विषय ठरतेय. काहीजण इथे पूर्वी मंदिर असल्याचा दावा करतायत, तर काही जण ही मशिद असल्याचा दावा करताना पाहायला मिळत आहे. तर सापडलेली वास्तू मंदिर आहे की, मशिद या अनुषंगाने बीडमध्ये मनसेच्या वतीने आज एक सभेचं आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी सभेला मनसेचे नेते प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. तर आपल्या भाषणातून महाजन यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित करत, आजही मोठ्या आवाजात वाजणाऱ्या भोंग्यावर कारवाई होत नसल्याचं म्हटले आहे. दरम्यान यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याबाबत कायदा होऊन देखील काद्यायाचे पालन केले जात नाही. त्यामुळे आजही अनेक ठिकाणी मोठ्या आवाजात भोंग्यावरून आवाज ऐकण्यासाठी मिळत आहे. मात्र यावर कुठलेही कारवाई होत नाही. मात्र उलट आम्हालाच देशांमध्ये भाषण करण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी अजाणच्या संदर्भात देखील योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रकाश महाजन यांनी केली.
MNS aggressive again on pretense
|