बातम्या

बेकायदेशीर ऑनलाईन गेम विरोधात मनसे आक्रमक

MNS aggressive against illegal online games


By nisha patil - 5/3/2024 8:20:11 PM
Share This News:



बेकायदेशीर ऑनलाईन गेम विरोधात मनसे आक्रमक

बेकायदेशीर ऑनलाईन गेम च्या विरोधात मनसे कोल्हापूर तर्फे आज आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांची आंदोलनासाठी वेळ घेऊन सुद्धा अप्परचिटणीस स्वप्निल पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आजच्या नियोजनामध्ये मनसेच्या निवेदनाची नोंद न घातलेने प्रथम भेटीसाठी नकार देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधार्थ मनसे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले. स्वप्निल पवार याला धारेवर धरून सर्व पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणा देत घुसले.
     

 सदर ऑनलाइन गेमच्या goaircircle.com, gameking.com , या अनाधिकृत डेंजरस वेबसाईट द्वारे फोपावलेला कोल्हापुरातील बेकायदेशीर ऑनलाईन गेम चा काळाबाजार स्टिंग ऑपरेशन मध्ये केलेल्या व्हिडिओ व छायाचित्रांसह संपूर्ण पत्त्यासह सबळ पुरावा जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येऊन गेम खेळण्यासाठी ऑनलाईन अकाऊंटला पेमेंट घेऊन राजरोसपणे हा काळा धंदा चालू असून याप्रसंगी करमणूक कर अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने हे सर्व चालत असल्याचा आरोप करून करमणूक कर अधिकाऱ्यास बडतर्फ करून गांधीनगरच्या मूळ सूत्रधाराला त्वरित अटक करण्याची मागणी मनसे शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केली .
           

या बेकायदेशीर ऑनलाईन गेमची अवैध दुकाने थाटून या गेम मुळे युवकांच्या मध्ये चेंज पाकीटमरी अशा पद्धतीचे गंभीर गुन्हे घडत आहेत. गेमच्या मोहोजाळात अडकलेले तरुण प्रसंगी दुचाकी चोरी करून त्या विक्री करून गेम खेळत आहेत. याद्वारे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. तरी सात दिवसात जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्वांवर कठोर कारवाई केली नाही तर सात दिवसानंतर मनसे स्टाईलने होणाऱ्या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्था बिघडली तर त्याची संपूर्ण जबाबदारी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाची राहील असे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले यांनी ठणकावून सांगितले .
           

सदर आंदोलन प्रसंगीजिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील, विजय करजगार, जिल्हा उपाध्यक्ष-निलेश धुम्मा,अमित पाटील, राजू पाटील, तालुका अध्यक्ष अभिजित पाटील, जिल्हा सचिव निलेश आजगावकर, शहर सचिव यतिन होरणे, रणजित वरेकर, सुरज कानूगडे, राजन हुल्लोळी, सुधीर कोठावळे, अभिजित संकपाळ, चंद्रकांत सुगते, अरविंद कांबळे, मोहसीन मुल्लाणी, सागर साळोखे, संजय चौगुले, बाजीराव दिंडोर्ले, अमित साळोखे, अक्षय शेवडे, राहुल पाटील, अमर कंदले, प्रवीण जाधव, रत्नदीप चोपडे आदी पदाधिकारी व मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.


बेकायदेशीर ऑनलाईन गेम विरोधात मनसे आक्रमक