बातम्या

मनसेच्या आमरण उपोषण ला यश - राजू दिंडोर्ले

MNS fast to death success Raju Dindorle


By nisha patil - 6/3/2024 11:40:24 AM
Share This News:



मनसेच्या आमरण उपोषण ला यश - राजू दिंडोर्ले

शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान खात्यात जमा

मनसेच्या वतीने छत्रपती शिवाजी चौकात जल्लोष 
    

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर तर्फे गोरगरीब नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी विभागीय सहनिबंधक कार्यालयासमोर 7 दिवसांचे आमरण उपोषण
         

करण्यात आलेले होते.यावेळी संबधित अधिकारी यांना मनसे स्टाईलने उत्तर देण्यात आले होते. मुख्यमंत्री कोल्हापूरात आले तेव्हा काळे झेंडे दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. या व आदी मनसेच्या दनक्याने अखेर महाराष्ट्र शासनाने गरजू व गोरगरीब शेतकऱ्यांना 50 हजाराचे अनुदान जमा करण्यात येणार आहे. या आनंदाने शिवाजी चौकात  जल्लोष करण्यात आला.यावेळी मनसेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहर अध्यक्ष प्रसाद पाटील,निलेश धुम्मा, राजू पाटील, अमित पाटील, यतिन होरणे, अभिजित पाटील, मनसे कोल्हापूरच्या सर्व  पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमा झाले होते.


मनसेच्या आमरण उपोषण ला यश - राजू दिंडोर्ले