बातम्या

कोल्हापुरात मनसेची शक्तिप्रदर्शन रॅली

MNS power demonstration rally in Kolhapur


By nisha patil - 1/29/2024 2:29:21 PM
Share This News:



महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचा इतिहास अधिक ज्वाळांतपणे  तेवत ठेवण्यासाठी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी कोल्हापूर मनसे जिल्हा अध्यक्षपदी राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्षपदी  प्रसाद पाटील यांची निवड केली .
  
या निवडी प्रित्यर्थ कोल्हापूर शहरामध्ये भव्य व जल्लोषी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. १००० हून अधिक मोटर सायकली सह मनसेचे भगवे ध्वज, रॅलीच्या अग्रभागी युवती दुचाकी सह प्रचंड संख्येने सहभागी झाल्या होत्या. मोठे भगवे ध्वज, राजसाहेबांच्या व मनसेच्या जय जयकाराच्या घोषणांनी कोल्हापूरचे रस्ते दुमदुमून गेले. जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने संपूर्ण शहर मनसे मय झाल्याचे चित्र पहावयास मिळाले.

रविवारी  ताराराणी चौकातून  मोटर सायकल रॅलीचे उ‌द्घाटन लोकसभा संघटक  बाळा शेडगे , संपर्क अध्यक्ष जयराज दादा लांडगे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले . ही रॅली सयाजी हॉटेल टाकाळा राजारामपुरी , उमा टॉकीज मार्गे  मिरजकर तिकटी, महाद्वार रोड  , छत्रपती शिवाजी चौक, दसरा चौक मार्गे बिंदू चौक येथे समारोप झाला .
 

 रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज , शाहू समाधी स्थळ, शाहू महाराज , महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुषहार अर्पण करण्यात आले.
             

याप्रसंगी नूतन जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, राजू पाटील, अमित पाटील व तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील , शहर सचिव निलेश आजगावकर  आदी उपस्थित होते.
             

 या रॅलीचे संयोजन निलेश आजगांवकर, सागर साळोखे, रणजित वरेकर, अरविंद कांबळे, गणेश शिंदे, यतीन होरणे, सुनील तुपे, राजन हुल्लोळी, सुधीर कोठावळे, चिंतामणी बकरे, बाजीराव दिंडोर्ले, संजय पाटील यांनी केले.


कोल्हापुरात मनसेची शक्तिप्रदर्शन रॅली