बातम्या

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच प्रोत्साहन अनुदान मुख्यमंत्र्यांचे मनसे आश्वासन

MNS promises incentive subsidy to farmers soon


By nisha patil - 2/22/2024 7:34:47 PM
Share This News:



 गोरगरीब नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचे गाजर दाखवण्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे गत वर्षभरात विविध प्रकारची आंदोलने करण्यात आली होती.
     

निवेदनापासून निदर्शने व आमरण उपोषणास सहकार मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर केवळ मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित असलेल्या प्रोत्साहन पर अनुदानाच्या विषयासंदर्भी मा. मुख्यमंत्र्यांना  महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्यात येणार होते. मात्र मा.मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन न करता चर्चेस येण्याचे आवाहन केले.
 

 सदरहू आवाहनास प्रतिसाद देऊन पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मा. मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तदप्रसंगी झालेल्या चर्चेमध्ये मा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील प्रोत्साहन पर अनुदानाच्या यादीमध्ये झालेला घोळ संपुष्टात आलेला असून प्रोत्साहन पर अनुदानाची अंतिम यादी शासनास प्राप्त झालेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून प्रस्तावित असलेल्या या विषयातील त्रुटींचे गांभीर्य आपले आमरण उपोषण व आपण मांडलेल्या मुद्द्यांद्वारे समजले.
     

नियमित कर्ज फेडणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब शेतकऱ्यांना याचा लाभ देण्याच्या शासनाचा निर्धार असून मनसेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील सर्व नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान योजनेचा लाभ आचारसंहितेपूर्वी मनसे कोल्हापूरच्या पदाधिकाऱ्यांमुळे प्राप्त होत असल्याचे अभिवचन मनसे कोल्हापूर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळास दिले.
   

सदर पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळामध्ये जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले , शहराध्यक्ष प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष निलेश धुम्मा, अमित पाटील,  तालुकाध्यक्ष अभिजीत पाटील, उपतालुका अध्यक्ष संजय चौगुले , यतीन होरणे, निलेश आजगावकर, अरविंद कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच प्रोत्साहन अनुदान मुख्यमंत्र्यांचे मनसे आश्वासन