बातम्या

डॉक्टर व रुग्णांच्या वेशात मनसेचे मलकापुरात झटका आंदोलन

MNS strikes in Malkapur disguised as doctors and patients


By nisha patil - 4/1/2025 10:35:21 PM
Share This News:



 शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर या ठिकाणी 50 बेडचे सर्व सोयी नियुक्त प्रशस्त उपजिल्हा रुग्णालय तात्काळ मंजूर व्हावे या मागणीसाठी आज मलकापूर ग्रामीण रुग्णालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने झटका आंदोलन करण्यात आलं.यावेळी
डॉक्टर तसेच रुग्णांचे वेश परिधान करून मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे शाहूवाडी तालुक्यात चर्चेचा विषय बनला.


मलकापूर ग्रामीण रुग्णालय पंचक्रोशीतील नागरिकांसाठी वरदायीनी ठरल आहे.मात्र काही उपचारांसाठी या ठिकाणी सोयी सुविधा नसल्याने रुग्णांची गैरसोय होतीय. त्यामुळे मलकापूर येथे सर्व सोयीसुविधाना युक्त उपजिल्हा रुग्णालय उभारावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी आज मनसेच्या वतीने हटके आंदोलन करण्यात आलं. शहरातील विठ्ठल मंदिरापासून ग्रामीण रुग्णालय मलकापूर पर्यंत पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर व रुग्णांचे वेश परिधान करून मोर्चा काढला.यावेळी नाही कुणाच्या बापाचं ...उपजिल्हा रुग्णालय आमच्या हक्काचं,मलकापूर मध्ये सर्व सोयी नियुक्त उपजिल्हा रुग्णालय मंजूर.. झालाच पाहिजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून निघाला .

यावेळी सिव्हिल सर्जन सरिता थोरात यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मा. विशाल मोरे, मनसे शाहूवाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम, तसेच सहकार सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश तांदळे, तालुका उपाध्यक्ष कुणाल काळे, संदीप लाळे , राहुल पाटील ,सुरज गोसावी ,पन्हाळा तालुका अध्यक्ष लखन लादे , रोहित कदम, मारुती विचारे, आधी मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.


डॉक्टर व रुग्णांच्या वेशात मनसेचे मलकापुरात झटका आंदोलन
Total Views: 37