बातम्या
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या निर्णयाचा मनसेचा तीव्र विरोध!
By nisha patil - 2/20/2025 6:39:35 PM
Share This News:
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या निर्णयाचा मनसेचा तीव्र विरोध!
तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा
कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घेतलेला निर्णय सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांसाठी महापुराचा धोका निर्माण करणारा आहे. २००५, २०१९ आणि २०२१ साली आलेल्या महापुरांमध्ये अलमट्टी बॅकवॉटरचा मोठा परिणाम दिसून आला होता. जलतज्ज्ञांनीही याचा पुराव्यानिशी उल्लेख केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयावर तातडीने आक्षेप घेतला असून, जर हा निर्णय मागे घेतला नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीच्या निर्णयाचा मनसेचा तीव्र विरोध!
|