बातम्या

अकिवाट दुर्घटनेतील कुटुंबीयांना खासदार धनंजय महाडिक यांची भेट

MP Dhananjay Mahadik met the families of Akiwat tragedy


By nisha patil - 8/14/2024 6:03:46 PM
Share This News:



अकिवाट-बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून झालेल्या दुर्घटनेत दोन लोकांचा मृत्यू झाला असून माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार अद्याप बेपत्ता आहेत. मंगळवारी खासदार धनंजय महाडिक यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांना भेटून सांत्वन केले. त्यांनी २०१९ च्या पूरानंतर याहीवर्षी पूरग्रस्तांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली. यावेळी त्यांनी दुर्घटनेतून बचावलेल्या रामदास माने, सागर माने, अरूण कांबळे यांची भेट घेतली आणि बुडताना वाचवणारे ओंकार बागडी व आनंदा बागडी यांचा विशेष सत्कार केला. तसेच, अकिवाट-बस्तवाड दरम्यानच्या रस्त्याची पाहणी करून पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी पुढील कारवाई करण्याचे आश्वासन दिले. भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर, तालुकाध्यक्ष मुकुंद गावडे आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.


अकिवाट दुर्घटनेतील कुटुंबीयांना खासदार धनंजय महाडिक यांची भेट