विशेष बातम्या
कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनसाठी उर्वरित ६७ गावांना निधी द्यावा – खासदार महाडिक यांची मागणी
By nisha patil - 3/4/2025 7:01:51 AM
Share This News:
कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनसाठी उर्वरित ६७ गावांना निधी द्यावा – खासदार महाडिक यांची मागणी
खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय जलशक्ती मंत्री नामदार सी.आर. पाटील यांची भेट घेतली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ६७ गावांना जलजीवन मिशन योजनेत सहभागी करून घेण्यासाठी निधी देण्याची मागणी केली. राज्य सरकारने यासंदर्भात केंद्र सरकारला विनंती पत्र पाठवले असून, मंत्री पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जलजीवन मिशन अंतर्गत "हर घर नल, हर घर जल" योजनेद्वारे प्रत्येक घरात शुद्ध पाणी पुरवले जाणार आहे. निधी मिळाल्यास कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के जलजीवन मिशनमध्ये यशस्वी होईल, असे महाडिक यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनसाठी उर्वरित ६७ गावांना निधी द्यावा – खासदार महाडिक यांची मागणी
|