बातम्या
खासदार नवनीत राणा यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा
By nisha patil - 12/16/2023 5:07:03 PM
Share This News:
हनुमान चालिसा पठणावरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि अमरावती लोकसभा मतदार संघाच्या अपक्ष आमदार नवनीत राणा यांच्यात सुरू झालेलं राजकीय वादअद्यापही संपलेलं दिसत नाही. खासदार राणा यांनी याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
युवा स्वाभिमान पक्षाचे नेते तथा बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवी राणा व त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकारातून अमरावती शहरातील हनुमान गढी येथे पाच दिवसीय शिवमहापुराण कथेचं आयोजन करण्यात आलय. कथेच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमादरम्यान खासदार राणा यांनी पुन्हा एकदा ठाकरे यांच्यावर टीका केलीय.मुंबईत ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेलेल्या राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सुमारे 14 दिवसांपर्यंत राणा तुरुंगात होते. तरुंगातून बाहेर पडल्यानंतर खासदार राणा यांना रडू कोसळले. पती आमदार रवी राणा यांना घट्ट मिठी मारत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. तेव्हापासून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा खासदार नवनीत राणा या उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतात. यंदा शिवमहापुराण कथा या आध्यात्मिक आयोजनाच्या व्यासपीठावरून राणा यांनी ठाकरेंवर टीका केली.
भानखेडा येथील हनुमान गढी परिसरात कथाकार प्रदीप मिश्रा हे शिवमहापुराण सांगणार आहे. तत्पूर्वी काढलेल्या कलश यात्रेच्या निमित्तानं बोलताना खासदार राणा म्हणाल्या की, हनुमान चालिसा पठण केली म्हणून आम्हाला तुरुंगात डांबण्यात आलं. तेव्हाच आम्ही अमरावतीच्या हनुमान गढी येथे 111 फुटाच्या हनुमान मूर्तीची उभारणी करण्याचा निर्णय घेतला. आता अयोध्येतील पवित्र गढीवरून आणलेली माती अमरावतीच्या हनुमान गढीची शोभा वाढवत आहे.
खासदार नवनीत राणा यांचा पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा
|