बातम्या

शाहू महाराजांच्या उमेदवारीवर खासदार संजय मंडलिकांचा मोठं वक्तव्य म्हणाले

MP Sanjay Mandalika made a big statement on Shahu Maharajs candidature


By nisha patil - 2/29/2024 7:55:24 PM
Share This News:



कोल्हापूर : कोल्हापूरचे  शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न करताना शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचे म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या लोकसभेवर भाजपने दावा केला असल्याची चर्चा आहे. तसेच भाजपच्या चिन्हावर लढावं लागेल अशीही चर्चा रंगली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय मंडलिक यांनी खुलासा करताना धनुष्यबाण चिन्हावर लढणार असल्याचे म्हटलं आहे. 
   

 गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमध्ये शाहू महाराजयांच्या उमेदवारीची चर्चा शिगेला पोहोचली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना संजय मंडलिक म्हणाले की, शाहू महाराजांना नेहमी वडिलांच्या समान मानतो. आम्ही त्यांचा नेहमीच आदर केला आहे. मात्र, निवडणुकीमध्ये समोर कोण आहे हे मी पाहिलेले नाही, असेही म्हणाले. 
   

अमित शाहांच्या भेटीवर संजय मंडलिक यांनी खुलासा केला आहे. ते म्हणाले की, अमित शाह यांना मी पक्ष प्रवेश केला त्यावेळी भेटलो होतो. त्यानंतर कधीही भेटलो नाही. शिंदे साहेब आमचे पक्षाचे सक्षम नेते आहेत, त्यामुळे अमित शाह यांना भेटलो नाही असे ते म्हणाले.  2009 मध्ये झालेल्या निवडणुकीच्या दाखला देत संजय मंडलिक म्हणाले की, 2009 मध्ये शरद पवार विरुद्ध कोल्हापूरची जनता अशी निवडणूक झाली होती. त्यावेळी तरुणांना संधी म्हणून शरद पवारांनी स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांना डावलले होते. आताच्या निवडणुकीतील कोल्हापूरकर आमच्या बाजूने उभं राहतील, असं संजय मंडलिक म्हणाले.


शाहू महाराजांच्या उमेदवारीवर खासदार संजय मंडलिकांचा मोठं वक्तव्य म्हणाले