बातम्या

शिंदे गटाचे खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार...?

MPs of Shinde group will contest election on lotus symbol


By nisha patil - 12/13/2023 3:54:21 PM
Share This News:



शिवसेना शिंदे गटातून  एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणूक शिंदे गटाचे काही खासदार भाजपाच्या  चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत कमळ फुललं होतं. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपाच्या कमळालाच यश मिळेल असं चित्र आहे. त्यामुळे धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्हावर लढल्यास अधिक फायदा होईल असे शिंदे गटातल्या काही खासदारांना वाटत असल्याचे म्हटलं जात आहे.
     

शिवसेनेत फूट पडल्यानंतर 18 पैकी 13 खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी अशी शिंदे गटातील काही खासदारांची इच्छा आहे. तेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे खासदार काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष आहे


शिंदे गटाचे खासदार कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार...?